ETV Bharat / international

गाझामध्ये पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 7:57 AM IST

Updated : Mar 1, 2024, 8:48 AM IST

Firing on Crowd in Gaza : गाझा शहरात मदत पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्यानं गुरुवारी हल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

गाझामध्ये अन्न वितरणादरम्यान पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू
गाझामध्ये अन्न वितरणादरम्यान पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू

गाझा सिटी Firing on Crowd in Gaza : गाझा शहरात अन्न वितरणादरम्यान पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्यानं गुरुवारी हल्ला केल्यानं 100 हून अधिक लोक ठार झाले. यासह, सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धातील मृतांची संख्या आता 30 हजारांहून अधिक झालीय. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सैनिकांनी गोळीबार केल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी मान्य केलंय. "जमावाकडून धमक्या मिळाल्यानंतर सैनिकांनी गोळीबार केला," असं त्यांनी सांगितलं.

मोठ्या प्रमाणात उपासमारीचं संकट : 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गाझा शहर आणि संपूर्ण उत्तर गाझाला इस्रायली हवाई, समुद्र आणि जमीन हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आलंय. हे क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे आणि अनेक महिन्यांपासून या प्रदेशापासून तुटलेलं आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचली नाही. मदत करणाऱ्या गटांचं म्हणणं आहे की, "गाझाच्या बऱ्याच भागात मानवतावादी मदत पोहोचवणं जवळजवळ अशक्य झालं. गाझाच्या 2.3 दशलक्ष पॅलेस्टिनी लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकांना उपासमारीला सामोरं जावं लागत आहे," असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय.

आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल किद्रा यांनी सांगितलं की, "गुरुवारच्या हल्ल्यात किमान 104 लोक मारले गेले आणि सुमारे 760 लोक जखमी झाले." आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "युद्धात मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या आता 30,035 वर पोहोचली आहे. तर 70,457 लोक जखमी झाले आहेत." या आकडेवारीत मृत नागरिक आणि सैनिकांच्या संख्येचा तपशील दिलेला नसला तरी, यात दोन तृतीयांश स्त्रिया आणि मुलं मारली गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. संयुक्त राष्ट्र महासभा मैदानात; इस्रायल पॅलेस्टाईन युद्धबंदीचा ठराव, भारताचं 'या' ठरावाच्या बाजुनं मतदान
  2. ज्यूंच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर एलॉन मस्कला उपरती, इस्त्रायलमध्ये जाऊन 'ही' घेतली माहिती
  3. Israel Hamas War : हमासनं गाझातील रुग्णालयात शस्त्रं लपवली? आयडीएफचा दावा काय? वाचा सविस्तर
Last Updated :Mar 1, 2024, 8:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.