ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 1:13 PM IST

Suresh Wadkar receives Lata Mangeshkar Award

ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा महाराष्ट्र सरकरच्या वतीने लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पुरस्कार त्यांना बहाल केला.

मुंबई - ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात वाडकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करत पुरस्काराने सन्मान केला.

सुरेश वाडकर यांना 2021 मध्ये पद्मश्री या भारतीय प्रजासत्ताकातील चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. "नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद जी यांच्या कार्यकाळात हा पुरस्कार मिळणे खरोखरच विशेष आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप आनंदी आहे. हा पुरस्कार मिळण्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आणि आता मला शेवटी ते मिळाले आहे,” असे त्यावेळी वाडकर यांनी एएनआयला सांगितले होते.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हे त्यांच्या हिंदी आणि मराठीतील पार्श्वगायनासाठी ओळखले जातात. गेल्या ४५ वर्षांपासून ते आपल्या आवाजाची प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. भक्तिसंगीतातही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. 'सपने में मिलती है', 'पहली बार मोहब्बत की है' आणि 'लागी आज सावन की' हे त्यांचे काही लोकप्रिय ट्रॅक आहेत.

'सोना करे झिलमिल झिलमिल' (चित्रपट 'पहेली'), 'सीने मी जलन' ('गमन') ही त्यांची सर्वात पहिले हिट गाणी होती. दिवंगत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे लक्ष वाडकरांच्या आवाजाने वेधून घेतले आणि त्यांनी त्यांची शिफारस त्या काळातील इतर आघाडीच्या संगीतकारांकडे केली होती.

आपल्या प्रवासात खूप मोठा पल्ला गाठताना वाडकर म्हणाले, " चित्रपट उद्योगात मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी धन्यता मानतो. लोकांच्या प्रेमाहून मोठा कोणताही पुरस्कार नाही. सुदैवाने, मी माझ्या कामातून ते साध्य करू शकलो. हा पुरस्कार मिळवण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. मी वयाच्या चौथ्या वर्षी गायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 30,000 ते 40,000 गाणी गायली आहेत."

हेही वाचा -

  1. "हा नंबर एक पुरस्कार!"; महाराष्ट्र भूषण सन्मानानं गौरवल्यावर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया
  2. जॅकी भगनानीसह लग्नात रकुल प्रीत सिंगची ब्राइडल एन्ट्री झाली व्हायरल
  3. सलमान खानच्या चेहरा रंगवलेल्या पँटसह फन्की एअरपोर्ट लूकने पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.