सलमान खानच्या चेहरा रंगवलेल्या पँटसह फन्की एअरपोर्ट लूकने पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 11:35 AM IST

Salman Khan

सलमान खान शुक्रवारी पहाटे जेव्हा मुंबई विमानतळावर अवतरला तेव्हा त्याचा फॅशनेबल अवतार पाहून सगळेच चकित झाले. फन्की ड्रेस घातलेल्या सलमानने घातलेल्या पँटच्या मागे त्याचाच चेहरा रंगवण्यात आला होता.

मुंबई - सुपरस्टार सलमान खान हा असाच एक अभिनेता आहे जो त्याच्या स्टाईलचे जास्त प्रयोग करण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु, मुंबई विमानतळावर तो जेव्हा दिसला तेव्हा त्याला पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याच्या लेटेस्ट फोटोमध्ये तो फॅशनेबल अवतारात पाहायला मिळाला.

Salman Khan
सलमान खान

'दबंग' स्टार सलमान खान शुक्रवारी पहाटे निळा टी-शर्ट परिधान करून विमानतळावर पोहोचला. त्याने यावेळी काळ्या रंगाचे खिसे असलेले जॅकेट घतले होते आणि पांढऱ्या रंगाची ट्राउजर परिधान केली होती. त्याच्या पांढऱ्या पँटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले कारण त्याच्या मागच्या बाजूला त्याचा चेहरा रंगवण्यात आला होता. त्याने विंटेज बेकर बॉय कॅप आणि काळ्या शूजसह त्याचा लूक पूर्ण केला.

Salman Khan
सलमान खानची पँट

सलमानचा फन्की लूक सर्वांनाच प्रभावित करणारा ठरला. त्याचे फोटो इंटरनेटवर पसरल्यानंतर चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना भाईजानचा हा लूक आवडला असून त्याचा स्वॅग चाहत्यांना आकर्षित करत आहे.

Salman Khan
सलमान खान आणि बाबा सिद्दीकी

मुंबई विमानतळावर पोहोचलेला सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. विमानतळाबाहेर त्याला भेटलेल्या लोकांशी तो जेव्हा बोलला तेव्हा भरपूर हशा पिकला. विमानतळावर त्याने राजकारणी बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा जीशान यांचीही भेट घेतली.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, सलमान सध्या त्याच्या 'टायगर 3' या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' 12 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तो आता प्राइम व्हिडिओवर प्रसारित होत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

Salman Khan
सलमान खान

'टायगर 3' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल खास बोलतांना सलमानने एएनआयला सांगितले की, "दिवाळीची वेळ होती आणि विश्वचषक चालू होता आणि सर्वांची उत्सुकता त्यात होती, पण तरीही आम्हाला मिळालेले आकडे अप्रतिम आहेत... आम्ही याबद्दल खूप कृतज्ञ आणि आनंदी आहोत."

कामाच्या आघाडीवर सलमान खान दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्या आगामी 'द बुल' चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्याचा सुपरस्टार शाहरुख खानसह आगामी 'टायगर विरुद्ध पठाण' देखील चर्चेत आहे.

हेही वाचा -

  1. 'आर्टिकल 370' बॉक्स ऑफिस ओपनिंग: यामी गौतम आणि प्रियामणीच्या चित्रपटाची उत्तम सुरुवात
  2. "हा नंबर एक पुरस्कार!"; महाराष्ट्र भूषण सन्मानानं गौरवल्यावर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया
  3. यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'शी टक्कर असूनही असूनही विद्युत जामवाल स्टारर 'क्रॅक'ची चांगली सुरुवात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.