'आर्टिकल 370' बॉक्स ऑफिस ओपनिंग: यामी गौतम आणि प्रियामणीच्या चित्रपटाची उत्तम सुरुवात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 10:17 AM IST

Article 370 Box Office Opening

Article 370 Box Office Opening: यामी गौतम आणि प्रियामणी अभिनीत 'आर्टिकल 370' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित हा चित्रपट जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबतच्या संवदनशील विषयावर आधारित आहे.

मुंबई - Article 370 Box Office Opening: यामी गौतम आणि प्रियामणी यांच्या भूमिका असलेला राजकीय थ्रिलर 'आर्टिकल 370' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित हा चित्रपट पंतप्रधान कार्यलयाच्या जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयावर आधारित आहे. अ‍ॅडव्हान्स तिकीट विक्रीमध्ये चित्रपटाला जोरदार प्रतिक्रिया मिळत आहे. याशिवाय संपूर्ण मल्टिप्लेक्सेसमध्ये 99 रुपयांच्या सवलतीच्या दरात तिकिटे या सिनेमा प्रेमींसाठीच्या ऑफरमुळे प्री-सेल्सला चालना मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अंदाजानुसार, 'आर्टिकल 370' हा पॉलिटिकल ड्रामा चित्रपट संपूर्ण भारतातील 1,500 सिनेमा हॉल आणि 2,200 स्क्रीन्समध्ये रिलीज झाली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मतानुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाने PVR, INOX आणि सिनेपोलिस या तीन राष्ट्रीय साखळींमध्ये 80,000 पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत आणि त्याच्या सुरुवातीच्या दिवशी अंदाजे 100,000 तिकिटे विकण्याच्या मार्गावर आहे.

चित्रपटाला मिळालेल्या प्री-सेल्समुळे, 10 कोटींहून अधिक ओपनिंग अपेक्षित होते, परंतु त्याची किंमत सामान्य तिकिटाच्या किमतीच्या निम्मी होत आहे. असे असले तरी 'आर्टिकल 370' ने 5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असावी आणि प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटतो यावर कमाईचे आकडे बदलू शकतात. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सुरुवातीच्या दिवसांच्या कमाईच्या आकड्यांवर आधारित 'लाल सिंग चड्ढा', 'विक्रम वेधा' आणि 'दृश्यम 2' सारख्या अनेक बिग-तिकीट ब्लॉकबस्टरला मागे टाकण्याची अपेक्षा आहे.

जिओ आणि बी 62 स्टुडिओजद्वारे निर्मित हा चित्रपट 2019 मध्ये भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याच्या सभोवतालच्या सत्य घटनांवर आधारित आहे. किरण करमरकर आणि अरुण गोविल यांच्यासह यामी गौतम आणि प्रियामणी मुख्य भूमिकेत आहेत. यामीच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विद्युत जामवालच्या 'क्रॅक'शी टक्कर होणार आहे.

अ‍ॅक्शनर 'क्रॅक' चित्रपटाची अंदाजे 45K तिकिटे विकली गेली आहेत आणि सुरुवातीच्या दिवशी अंदाजे 50K तिकिटांची विक्री होण्याची अपेक्षा आहे. 'क्रॅक' अंदाजे 3 कोटी नेट उघडण्यास सक्षम असेल असा अंदाज आहे. चित्रपटाबद्दलच्या माऊथ पब्लिसिटीवर या आकड्यांमध्ये चढ उतार होऊ शकतात.

हेही वाचा -

  1. हा माझा सर्वोत्तम सन्मान, 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचे भावोद्गार
  2. यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'शी टक्कर असूनही असूनही विद्युत जामवाल स्टारर 'क्रॅक'ची चांगली सुरुवात
  3. मनोज जरांगे पाटील यांच्यावर बनतोय बायोपिक, 'संघर्षयोद्धा' एप्रिलमध्ये होणार रिलीज!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.