ETV Bharat / entertainment

अ‍ॅडल्ट फिल्म स्टार जॉनी सिन्ससह रणवीर सिंगने केलेली जाहिरात रश्मी देसाईला वाटते 'अपमानास्पद'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 2:47 PM IST

Rashami Desai Reacts to Ranveer Singh : रणवीर सिंगने अलिकडेच एका लैंगिक आरोग्य सेवा ब्रँडसाठी अ‍ॅडल्ट फिल्म स्टार जॉनी सिन्ससह काम केलं आहे. ही जाहिरात पाहून अभिनेत्री रश्मी देसाई नाराज झाली आहे. तिला ही जाहिरात 'अपमानास्पद' वाटली आहे.

Rashami Desai Reacts to Ranveer Singh
अ‍ॅडल्ट फिल्म स्टार जॉनी सिन्ससह रणवीर सिंग

मुंबई - Rashami Desai Reacts to Ranveer Singh : रणवीर सिंगच्या अलीकडील जाहिरातीमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म स्टार जॉनी सिन्सच्या बरोबर दिसला आहे. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलंय तर काहींनी याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. यामध्ये तो अतिशयोक्त संवाद आणि साऊंड इफेक्ट्ससह हिंदी मालिकांचे विडंबन करत व्यावसायिकदृष्ट्या लैंगिक आरोग्य सेवा ब्रँडचा प्रचार करताना दिसतोय. सिन्ससह रणवीर सिंग काम करत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री रश्मी देसाईनेही आपली नापसंती व्यक्त केली आहे.

Rashami Desai Reacts to Ranveer Singh
रणवीर सिंगने केलेली जाहिरात रश्मी देसाईला वाटते 'अपमानास्पद'

हिंदी टेलिव्हिजन शो 'उत्तरन' या गाजलेल्या मालकेतील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रश्मीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर जाहिरातीबद्दल नाराज व्यक्त केली. प्रादेशिक चित्रपटांपासून टीव्ही मालिकांकडे वळल्यानंतर, रश्मीनं असं मत व्यक्त केलंय की ही जाहिरात मुख्य प्रवाहातील चित्रपटात काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या टेलिव्हिजन कलाकारांबद्दल अपमानास्पद आहे.

इंस्टाग्राम स्टोरीजवर रश्मीने लिहिलं की, "मी प्रादेशिक चित्रपट उद्योगातून माझ्या कामाची सुरुवात केली आहे. त्यानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोक याला छोटा पडदा म्हणतात. जिथे सामान्य लोक बातम्या, क्रिकेट, बॉलिवूड चित्रपट आणि बरेच काही पाहतात. ही रील पाहिल्यानंतर, मला वाटले की ही सर्व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अपमानास्पद आहे. कारण आम्हाला नेहमीच लहान वाटलं जातं. आम्हा कलाकारांना मोठ्या पडद्यावर देखील काम करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकजण कठोर परिश्रम करत आहे. पण मला माफ करा, टीव्ही शोमध्ये हे सर्व दिसत नाही. परंतु टीव्ही उद्योगातील सर्वांसाठी ही एक रिअ‍ॅलिटी चेक असून मला वाटत की ही एक थप्पड आहे. कदाचित मी थोडं अधिक बोलत आहे असं वाटू शकतं. परंतु आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आपली संस्कृती आणि प्रेम दाखवत असतो. टीव्हीच्या क्षेत्रात मी आदरपूर्ण प्रवास करत असल्यामुळे मला वाईट वाटलं. मला वाटतं माझ्या भावना तुम्हाला कळल्या असतील."

रश्मीच्या टीकेशी काहींनी पूर्ण सहमती दाखवली, परंतु काहींनी ती फेटाळून लावली आणि असा युक्तिवाद केला की विडंबन सामान्य आहे आणि ते गांभीर्याने घेतले जात नाही. वाद असूनही रणवीरला नकुल मेहता आणि करण कुंद्रा यांसारख्या सहकारी कलाकारांकडून कौतुक मिळालं आहे. त्यांनी जाहिरातीतील रणवीरच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. याव्यतिरिक्त, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा आणि विक्रांत मॅसी यांसारख्या ख्यातनाम व्यक्तींनी रणवीर आणि जॉनी सिन्स एकत्र काम करत असल्याबद्दल कौतुक केलं आणि याकडे त्यांनी लैंगिक निरोगीपणासाठीचे सकारात्मक समर्थन म्हणून पाहिले. जाहिरातीच्या योग्यतेबद्दल मतं विभागली गेली असली तरी, लैंगिक आरोग्याविषयी निर्विवादपणे संभाषणांना सुरुवात झाली आहे.

हेही वाचा -

  1. 'शैतान'मधील 'खुशियां बटोर लो' गाण्याचा टीझर उद्या होणार रिलीज
  2. वरूण तेजनं 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'साठी रुहानी शर्माचं केलं स्वागत
  3. केट ब्लँचेट, डेव्हिड बेकहॅमसह 'बाफ्टा अवॉर्ड्स'मध्ये प्रेझेन्टर म्हणून सामील होणार दीपिका पदुकोण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.