ETV Bharat / entertainment

वरूण तेजनं 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'साठी रुहानी शर्माचं केलं स्वागत

Operation Valentine : वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या आगामी चित्रपटात अभिनेत्री रुहानी शर्माही सामील झाली आहे. यामध्ये ती तान्या शर्मा या भारतीय वायुसेनेच्या लढाऊ सदस्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Operation Valentine
ऑपरेशन व्हॅलेंटाईन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 13, 2024 at 9:53 AM IST

|

Updated : February 13, 2024 at 12:28 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - Operation Valentine बहुप्रतिक्षित देशभक्तीपर थ्रिलर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची सध्या जोरदार हवा आहे. साऊथ अभिनेता वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट शौर्याची एक वेगळी गाथा प्रेक्षकांच्या समोर उलगडणार आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रुहानी शर्मा सामील झाली असून ती यामध्ये भारतीय वायुसेना विभागाची लढाऊ सदस्य म्हणून झळकणार आहे. या चित्रपटाच्या टीममध्ये तिचे वरुण तेजने स्वागत केले असून आपल्या इन्स्टाग्रामवर रुहानीच्या पात्राची ओळख करुन दिली आहे.

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वरुणने चाहत्यांना फर्स्ट-लूक पोस्टरद्वारे ट्रीट दिली आहे. या चित्रपटात रुहानी तान्या शर्मा ही भूमिका साकारत असून पोस्टरवर ती भारतीय वायुसेनेच्या गणवेशात दिसत असून उड्डाण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पोस्टर शेअर करताना वरुणने लिहिले, "रुहानी शर्मा तान्या शर्माच्या भूमिकेत. ऑपरेशन व्हॅलेंटाईनवर तिचे स्वागत आहे."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपटाची कथा आघाडीवर असलेल्या हवाई दलातील पराक्रमी वीरांच्या शौर्याभोवती फिरते. राष्ट्राचे रक्षण करताना त्यांना येणाऱ्या आव्हानांचा सामना यामध्ये दाखवण्यात येणार आहे. सत्य घटनांपासून प्रेरित 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे. या चित्रपटात वरुण तेज एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत आहे. निर्मात्यांनी नुकतेच 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' च्या टीझरचे लॉन्चिंग केले होते. त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळालं आहे. हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत झालेला हा चित्रपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार होता. या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असून आता हा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

वरुण तेजने नवीन रिलीज तारखेची घोषणा करताना, X वर लिहिले होते, "1 मार्च 2024 ला टार्गेट लॉक करत आहे! सिनेमागृहात भेटू. ऑपरेशन व्हॅलेंटाईन!" या चित्रपटाचे प्रदर्शन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला आहे. खऱंतर डिसेंबर 2023 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्याची योजना होती. परंतु व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये विलंब झाल्यामुळे निर्मात्यांना ते 16 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि अखेर हा चित्रपट 1 मार्चला रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. वरुण तेजनं वाघा बॉर्डरवर लॉन्च केले 'वंदे मातरम' गाणे, गाण्यासह टीझरलाही मिळतोय उदंड प्रतिसाद
  2. अल्लू अर्जुनने 'चुलत भावां'सोबत साजरा केला ख्रिसमस, राम चरण-वरुण तेजसह लुटला 'फन नाईट'चा आनंद
  3. Varun Tej Lavanya Tripathi : साऊथ स्टार कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी हैदराबाद विमानतळावर स्पॉट
Last Updated : February 13, 2024 at 12:28 PM IST