ETV Bharat / entertainment

'दिल बेचारा' चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल केला मुकेश छाबरा यांनी खुलासा - dil bechara sequel

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 5:01 PM IST

Dil Bechara 2 : 'दिल बेचारा' या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल आता अनेक बातम्या समोर येत आहे. निर्मात मुकेश छाबरा यांनी आता या चित्रपटाबद्दल एक खुलासा केला आहे.

Dil Bechara 2
दिल बेचारा (मुकेश छाबड़ा-सुशांत सिंह राजपूत(@castingchhabra/@sushantsinghrajput instagram))

मुंबई - Dil Bechara 2 : 'दिल बेचारा' हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाला चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. नुकतेच चित्रपट निर्माते मुकेश छाबरा यांनी 'दिल बेचारा'च्या सीक्वेलबद्दल उघडपणे सांगितलं आहे. दरम्यान, हा चित्रपट मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केला होता. एका मुलाखतीत मुकेश छाबरा यांनी सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघी स्टारर 'दिल बेचारा' या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल खुलासा करत म्हटलं, 'होय, मी याबद्दल ट्विट केलं कारण मी 'दिल बेचारा 2' बनवण्याचा विचार करत होतो. 'दिल बेचारा' हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. कारण या चित्रपटाशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत आणि अर्थातच सुशांतबरोबर देखील. त्यामुळे त्या चित्रपटाला हात लावू नये, हे माझ्या लक्षात आले. हे शीर्षक नेहमीच सुशांतचे असेल, मला ते नाव वापरायचे नाही. मला सुशांतबरोबर तीन-चार चित्रपटांमध्ये काम करायचे होते. आता हे माझ स्वप्नचं राहिलं."

'दिल बेचारा'चं सीक्वल : 'दिल बेचारा' 2020 मध्ये रिलीज झालेला सुशांतचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट त्याच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. आता मुकेश छाबरा यांनी शेवटी सांगितलं आहे की ते 'दिल बेचारा'चा सीक्वेल घेऊन येणार नाही. याआधी मुकेश छाबरानं एक्सवर 'दिल बेचारा' चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना हा सल्ला दिला होता की, तुम्ही 'दिल बेचारा 2' हा बनवू नका. या चित्रपटासाठी फक्त सुशांत योग्य आहे. यानंतर त्यांनी या चित्रपटाबद्दल स्पष्टीकरण दिलं.

सुशांत सिंगचा मृत्यू : सुशांतचा मृतदेह 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आढळला होता. जुलै 2020 मध्ये, त्याच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि दावा केला की रिया चक्रवर्ती, आणि तिच्या नातेवाईकांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केलं होतं. यानंतर रियाला अटक करण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी तिला निर्दोष सोडण्यात आलं होतं. आता देखील सोशल मीडियावर सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवा, यासाठी पोस्ट शेअर करताना दिसतात. आता देखील लोक सुशांतला विसरलेले नाहीत.

हेही वाचा :

  1. 'रामायण'साठी रणबीर कपूरची नवीन हेअरकट, फोटो व्हायरल पहा - ranbir kapoor new haircut
  2. सलमान स्टारर 'सिकंदर'च्या स्टारकास्टमध्ये रश्मिका मंदान्ना सामील, कृतज्ञतेची भावना केली व्यक्त - Rashmika Mandanna
  3. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपी रफिक चौधरीने आणखी दोन स्टारच्या घरांची केली होती पाहणी - Salman Khan house firing case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.