ETV Bharat / state

सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपी रफिक चौधरीने आणखी दोन स्टारच्या घरांची केली होती पाहणी - Salman Khan house firing case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 11:37 AM IST

Salman Khan house firing case : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रफिक चौधरीने सलमान खानच्या निवासस्थानीच नव्हे आणखी दोन स्टारच्या घरांची केली पाहणी केली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात अनमोल बिश्नोई याने नेमबाजांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचंही उघड झालं आहे.

Salman Khan
सलमान खान (Salman Khan Instagram)

मुंबई - Salman Khan house firing case : राजस्थानमधून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद रफिक चौधरी या पाचव्या आरोपीने केवळ सलमान खानच्या निवासस्थानीच नव्हे तर इतर दोन बॉलीवूड अभिनेत्यांच्या घरीही गुप्तहेरगिरी केली होती, असे मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने नेमबाजांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं तपासात पुढे आलं आहे. 15 मार्च 2024 रोजी पनवेलमध्ये शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी मिळाल्यानंतर अनमोलने शूटर्सना लक्ष्याची माहिती दिली, त्यांना सलमानच्या घरावर गोळीबार करण्याची सूचना दिली होती.

क्राइम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद रफिक चौधरी याने 12 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या अपार्टमेंटच्या इमारतीची पाहणी केली होती आणि त्याचा व्हिडिओही बनवून तो अनमोलला पाठवला होता. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात देखील 40000 रुपये देऊन शूटर्स सागर पाल आणि विकी गुप्ता यांना पनवेलमध्ये घर घेण्यासाठी पाठवले होते. तसेच बिश्नोई गॅंगने सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुंबईत फिरण्यासाठी देखील सांगितले. मात्र भाड्याने घर मिळवू न शकल्याने पाल आणि गुप्ता पुन्हा आपल्या गावी बिहारला गेले. त्यानंतर मार्च महिन्यात एका रिक्षावाल्याच्या ओळखीने पाल आणि गुप्ताने पनवेल येथे गावात भाड्याने घर मिळवले. त्यानंतर त्यांना पंजाबच्या सोनू कुमार बिश्नोई आणि अनुज थापन यांनी शस्त्र पुरवली. त्यानंतर त्यांना सलमान खानच्या घरावर गोळीबार करायला बिष्णोई गॅंगकडून आदेश देण्यात आले होते असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिले आहे. जवळपास या दोन शूटर्सला पाच लाखांच्या आसपास रक्कम देण्यात आली होती. पाल आणि गुप्ता या नेमबाजांना गोळीबार करण्याची भीती वाटत होती. मात्र अनमोलनं त्यांना हे काम पुण्याचं असल्याचं सांगून त्यांच्या मनातील भीती काढून टाकत त्यांना प्रेरित केलं होतं.

या दोघांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बिश्नोई टोळीने मुंबईत पाठवले होते. अनेक प्रयत्न करूनही त्यांना निवासाची व्यवस्था करता आली नाही. शेवटी, मार्च 2024 मध्ये पनवेलमधील स्थानिक रिक्षाचालकाच्या मदतीने, त्यांनी हरिग्राम परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. नियोजित गोळीबाराची घटना सूचनेनुसार पार पडल्यानंतर नेमबाजांना एकूण 3 लाख रुपये मिळाले होते. या प्रकरणात गुंतलेल्या सर्व व्यक्तींना पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे.

14 एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईतील वांद्रे परिसरात खळबळ माजली होती. त्यानंतर झालेल्या संशयीतांच्या अटकेमुळे या गोळीबाराचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले होते. मुंबई पोलिसांकडून गोळीबारात सहभागी असलेल्या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा -

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case

सलमान खान गोळीबार प्रकरण; तोपर्यंत अनुजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, सीबीआय चौकशी करा: नातेवाईक आक्रमक - Salman Khan House Firing Case

खळबळजनक! सलमान खान गोळीबार प्रकरणातल्या आरोपीनं लॉकअपमध्ये केली आत्महत्या, सीआयडी करणार चौकशी - Salman Khan shooting case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.