ETV Bharat / entertainment

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या हाऊस फायरिंग प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला पकडलं आहे. या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी आहे.

Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घरावर गोळीबार (सलमान खान (Instagram- beingsalmankhan))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 1:51 PM IST

मुंबई - Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानच्या हाऊस फायरिंग प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळालं आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपीला मुंबई गुन्हे शाखेनं राजस्थानमधून अटक केली आहे. मोहम्मद चौधरी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरीनं सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना मदत केली होती. याशिवाय चौधरीनं या शूटर्सला पैशाची मदतदेखील केली होती. मोहम्मद चौधरीला आज 7 मे रोजी जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सलमान खान हाऊस फायरिंग प्रकरणातील आरोपी अनुज थापननं मुंबई पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती.

सलमान खानच्या हाऊस फायरिंग प्रकरणी 5वा आरोपी ताब्यात : आरोपी अनुजला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषीत केलं होतं. 14 एप्रिल 2024 रोजी आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांनी सलमान खानच्या बाहेर चार राऊंड फायर केले होते. त्यापैकी एक गोळी सलमान खानच्या घराच्या भिंतीला लागली होती. यानंतर दोन्ही आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. पोलिसांनी या दोन आरोपींना कच्छमधून अटक केली होती. चौकशीदरम्यान या आरोपींनी सुरतच्या तापी नदीत गोळीबाराची बंदूकी फेकल्याचं सांगितले होतं. दोन्ही आरोपींनी ही माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेनं त्यांना तापी नदीवर नेलं होत. तेथून दोन्ही पिस्तूल जप्त केल्या गेल्या होत्या.

सलमान खाननं केली 'सिकंदर'ची घोषणा : मुंबई पोलिसांच्या ताब्यात दोन्ही आरोपी असून गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबाराची घटना ईदच्या तीन दिवसांनंतर झाली होती. सलमाननं ईदच्या दिवशी त्याच्या नवीन चित्रपट 'सिकंदर'ची घोषणा केली होती. त्याचा हा चित्रपट ईद 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'टाइगर वर्सेस पठान' या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर दिसणार आहे. याशिवाय पुढं तो 'दंबग 4'मध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त - Alia Bhatt Deepfake Video
  2. मेट गाला 2024 मध्ये 10 हजार तासात बनलेला साडी गाऊन परिधान केलेल्या ईशा अंबानीचा दबदबा - Met Gala 2024
  3. मेट गालामध्ये आलिया भट्टनं परदेशी भूमीवर फडकवला भारतीय संस्कृतीचा झेंडा, पाहा फोटो - ALIA BHATT MET GALA 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.