ETV Bharat / entertainment

आईची भूमिका साकारून 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर केलं राज्य - mothers day 2024 special

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 12:37 PM IST

Mothers Day 2024 : आज सर्वासाठी खूप विशेष दिवस आहे. हा दिवस प्रत्येक आईचा दिवस आहे. आज आपण पडद्यावर साकारल्या गेलेल्या आईच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत. आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

Mothers Day 2024
मदर्स डे (Source- instagram Reema Lagu, Farida Jalal, Jaya Bacchan)

मुंबई - Mothers Day 2024 : भारतीय संस्कृतीत आईला देवांपेक्षा वरचे स्थान दिलं गेलं आहे. आज 12 मार्च रोजी मातृदिन आहे. या दिवशी लोक त्यांच्या आईबद्दल विशेष प्रेम आणि आदर व्यक्त करतात. आपण आपल्या आईला प्रेम आणि आदर देण्यासाठी कोणत्याही एका दिवसावर अवलंबून नाही. फिल्मी दुनियेनेही पडद्यावर आईची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेन चाहत्यांची मनं जिंकले आहेत.

  • निरूपा रॉय : अभिनेत्री निरुपा रॉय ही 70 आणि 80 च्या दशकातील अभिनेत्रीनं प्रेमळ आईची भूमिका साकारला. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलं होत. फिल्मी दुनियेत तिची ओळख आई म्हणून आहे. निरुपा रॉयनं जवळपास प्रत्येक नायकाच्या आईची भूमिका साकारली आहे. 'दीवार' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या आईची भूमिका साकारली होती. दीवारमधील मेरे पास माँ हे, हा डायलॉग प्रचंड गाजला होता.
  • राखी : अभिनेत्री राखीनं तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलंय. शाहरुख आणि सलमान खानच्या 'करण अर्जुन' या चित्रपटात तिनं आईची अशी भूमिका साकारली होती. ही भूमिका अनेकांना आवडली होती. आजही हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात. या चित्रपटामध्ये राखीनं सुंदर अभिनय केला होता.
  • रीमा लागू : अभिनेत्री रीमा लागूनं अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 'हम साथ साथ हैं' चित्रपटातील तिची आईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'कयामत से कयामत तक', 'मैने प्यार किया' आणि 'कल हो ना हो' सारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारून तिनं अनेकांचं मनं जिंकले आहेत.
  • फरीदा जलाल : अभिनेत्री फरीदा जलालनं हिंदी चित्रपटांमध्ये आईची भूमिका अनेकदा साकारली आहे. 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये त्यांनी काजोलच्या आईची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती. 'कुछ कुछ होता है', 'कहो ना प्यार है' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिनं आईची भूमिका केली आहे.
  • जया बच्चन : अभिनेत्री जया बच्चन यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. जया यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो' यांसारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

हेही वाचा :

  1. क्रिती सेनॉननं भावी जोडीदारीबद्दल केला खुलासा - KRITI SANON
  2. दीपक तिजोरी दिग्दर्शित टिप्प्सी चित्रपटाच्या प्रीमियरला सेलेब्रिटींची मांदियाळी - Deepak Tijori
  3. शिल्पा शेट्टीनं केदारनाथ धाम आणि माँ वैष्णो देवीच्या दर्शनामधील व्हिडिओ केला शेअर, पाहा पोस्ट - Shilpa Shetty
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.