ETV Bharat / entertainment

अल्लु अर्जुननं हैदराबादमध्ये केलं मतदान, वायएसआर काँग्रेसला पाठिंब्याबद्दल सोडलं मौन - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 12:10 PM IST

Lok Sabha Election 2024: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनने लोकसभा निवडणूक 2024 साठी हैदराबादमध्ये मतदान केले आणि नागरिकांना जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन केलं. आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या रॅलीत तो दिसल्यामुळे त्याच्यावर पक्षीय विचारसरणीचा शिक्का मारला जात होता. मात्र त्यानं तटस्थ असल्याचं सांगून कोणत्याही पक्षाशी राजकीयदृष्ट्या संलग्न नसल्याचं तो म्हणाला.

Lok Sabha Election 2024
ल्लू अर्जुन (Allu Arjun Votes in Hyderabad)

ल्लू अर्जुन (Allu Arjun Votes in Hyderabad)

हैदराबाद - Lok Sabha Election 2024: अभिनेता अल्लू अर्जुनने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. 'पुष्पा' चित्रपटातील भूमिकेमुळे देशव्यापी प्रसिद्धी मिळवलेल्या अल्लुने नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे.

तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेल अल्लू अर्जुन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादमधील सुरुवातीच्या मतदारांपैकी एक होता. पांढरा टी आणि काळी पँट घालून शांतपणे तो मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहून तो संयमाने थांबला. सहकारी मतदारांशी त्यानं शुभेच्छांची देवाणघेवाणही केली.

मतदान केल्यानंतर अल्लू अर्जुनने मीडियाशी बोलताना जबाबदारीने मतदान करण्याचे महत्त्व पटवून दिले. तो म्हणाले, "आम्हा सर्वांसाठी, या देशातील नागरिकांसाठी हा अत्यंत जबाबदारचा दिवस आहे... कृपया तुमचे मत द्या आणि कर्तव्य म्हणून मतदान करा."

अलिकडेच नंद्याल या आंध्रप्रदेशमधील मतदार संघामध्ये अल्लू अर्जुनने शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांना पाठिंबा व्यक्त केल्यामुळे तो वायएसआरसीपी पक्षाचा आरोप करत असल्याची चर्चा रंगली होती. गर्दीला अभिवादन करतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. खरंतर त्याचा चुलता पवन कल्याण आंध्र प्रदेशमध्ये निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे. त्यामुळे अल्लु अर्जुनचे वायएसआरसीपीच्या उमेदवारासाठी पाठिंबा देणं आश्चर्याचं मानलं जात होतं. मात्र मतदानानंतर आपला कुठल्याही पक्षाशी संबंध नसल्याचं तो म्हणाला. आपण तटस्थ असल्याचं सांगताना तो म्हणाला, "मी कोणत्याही पक्षाशी राजकीय संबंध ठेवत नाही. मी सर्व पक्षांशी तटस्थ आहे."

कामाच्या आघाडीवर अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या आगामी पुष्पा 2 ची प्रतीक्षा करत आहेत. पुष्पा: द रुल असं शीर्षक असलेला हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. विकी कौशल सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - Zara Hatke Zara Bachke
  2. 'मदर्स डे'निमित्त बॉलिवूड चित्रपटामधील आईवरचे प्रसिद्ध डायलॉग; पाहा फोटो - Happy mothers day
  3. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक - anushka sharm
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.