ETV Bharat / entertainment

सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एल्विश यादवनं शेअर केली पहिली पोस्ट - Elvish Yadav post

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 1:02 PM IST

Elvish Yadav post : यूट्यूबर एल्विश यादवची आता जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. एल्विशला नोएडा पोलिसांनी सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी अटक केली होती.

Elvish Yadav post
एल्विश यादव

मुंबई - Elvish Yadav post : बिग बॉस ओटीटी विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. एल्विशच्या जामिनसाठी एनडीपीएसच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. एल्विशला कोर्टाकडून 50-50 हजार रुपयांच्या बेल बॉन्डवर जामीन मिळाला आहे. एल्विशला नोएडा पोलिसांनी सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर अनेक काही गोष्टी समोर आल्या होत्या. अटकेनंतर बक्सर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर एल्विश यादवनं सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

एल्विश यादवची सोशल मीडिया पोस्ट : तुरुंगातून सुटल्यानंतर एल्विशनं त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत, तो काळ्या स्लीव्हलेस जॅकेटसह पांढरा शर्ट आणि निळ्या डेनिम जीन्समध्ये लक्झरी कारच्या बाजूला उभा असल्याचा दिसत आहे. या पोस्टवर 'बिग बॉस 17' फेम अभिषेक डोवालनं लिहिलं, 'भाऊ, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला'. तर काही चाहत्यांनी 'किंग इज बॅक' असं या पोस्टवर लिहिलं आहे. एल्विशनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''वेळ दाखवू शकत नाही. पण आता खूप काही दिसू शकते.'' एल्विशनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना थम्ब्स अप देताना दिसत आहे.

एल्विश यादव झाली होती अटक : पोलिसांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला नोएडा सेक्टर 49 मध्ये छापा टाकला आला होता. या छाप्यात पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पाच कोब्रासह नऊ सापांची सुटका केली होती. सर्व नऊ सापांमधील विष ग्रंथी गायब असल्याचं तपासात समोर आलं होतं. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून 20 मिली सापाचे विषही जप्त केलं होतं. यानंतर एल्विशनं याप्रकरणी आरोप नाकारले होते. 17 मार्च रोजी एल्विशला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर सापाच्या विष तस्करी प्रकरणी एल्विश यादव काही दिवसांपासून गौतम बुद्ध नगरच्या बक्सर तुरुंगात होता.

हेही वाचा :

  1. यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपटात साई पल्लवी की करिना असणार नायिका? निर्मात्यांनी केला खुलासा - Toxic Movie
  2. रकुल प्रीत सिंग ते क्रिती खरबंदा 'या' नववधू पहिला होळी साजरी करण्यासाठी सज्ज - first festival of colors
  3. अरहान खानचा नवीन पॉडकास्ट 'डंब बिर्याणी'मध्ये अरबाज आणि मलायका दिसणार, टीझर रिलीज - Arhaan Khan Podcast Dumb Biryani
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.