ETV Bharat / entertainment

अरहान खानचा नवीन पॉडकास्ट 'डंब बिर्याणी'मध्ये अरबाज आणि मलायका दिसणार, टीझर रिलीज - Arhaan Khan Podcast Dumb Biryani

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 11:34 AM IST

Arhaan Khan Podcast Dumb Biryani : हिंदी चित्रपटसृष्टीत अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा नवीन पॉडकास्ट 'डंब बिर्याणी' घेऊन येत आहे. आता 'डंब बिर्याणी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Arhaan Khan Podcast Dumb Biryani
अरहान खानचा पॉडकास्ट डंब बिर्याणी

मुंबई- Arhaan Khan Podcast Dumb Biryani : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान स्वतःचे पॉडकास्ट 'डंब बिर्याणी' सुरू करणार आहे. आता याची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या शोमध्ये त्यांचे आई-वडील पाहुणे म्हणून येणार आहेत. याशिवाय या पॉडकास्टमध्ये सलमान खानदेखील उपस्थित राहणार आहे. सोशल मीडियावर 'डंब बिर्याणी'चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात मलायका अरोरा , अरबाज खान आणि सलमान खान हे स्टार्स दिसत आहे. हा पॉडकास्ट अरहान खान, देव रैनी आणि आरुष वर्मा हे तीन मित्र होस्ट करणार आहेत.

अरहान खानचा पॉडकास्ट : क्लिपच्या सुरुवातीला अरहान आणि त्याच्या मित्रांबरोबर कॅबमध्ये बसलेला दिसतो. यानंतर या कॅबमध्ये त्याच्याबरोबर ओरहान अवत्रामणी उर्फ ओरीदेखील आहे. यावेळी ओरी या तीन मुलांन माहित देताना दिसतो. ड्रिंकचा आस्वाद घेत असताना, ऑरी म्हणतो, ''20चे वय हे मजा करण्यासाठी आहे. 30 वय शिकण्यासाठीचे आहे.'' यानंतर या पॉडकास्टमध्ये अरबाज खान अरहानला कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देतो. तर मलायका तिच्या 'बॉडी काउंट'बद्दलच्या प्रश्नावर बोलताना दिसत आहे. यानंतर सलमान खानची एंट्री आहे. दरम्यान बॅकग्राउंडमध्ये ‘स्वागत नहीं करोगे आप हमारा’ हा डायलॉग आहे. अरहान खाननं दोन मित्रांसह ‘डंब बिर्याणी’ पॉडकास्ट सुरू केले आहे. हे पॉडकास्ट यूट्यूबवर येणार आहे. मात्र, ‘डंब बिर्याणी’ रिलीज डेटबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

'डंब बिर्याणी'च्या टीझरला भरभरून प्रेम : या टीझरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. या टीझरमध्ये मलायका अरोराच्या ओळीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलायका आणि अरबाज खान वेगळे झाले आहेत. नुकतेच अरबाजनं दुसरे लग्नही केले आहे. मलायका म्हणते की, " ती सध्या तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ जगत आहे." अरहान खानला त्याच्या या नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या टीझरवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा :

  1. शहीद दिवसानिमित्त पाहता येतील असे अलीकडेच प्रदर्शित झालेले आणि आगामी देशभक्तीपर चित्रपट - Shaheed Diwas 2024
  2. "फुकट सल्ला देणे बंद" म्हणत, अनुराग कश्यपने केला दृढ संकल्प - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS
  3. 'भूल भुलैया 3'मधील कार्तिक आर्यनच्या एंट्री गाण्यात थिकरणार 1000 डान्सर्स - Bhool Bhulaiyaa 3 Song
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.