ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3'मधील कार्तिक आर्यनच्या एंट्री गाण्यात थिकरणार 1000 डान्सर्स - Bhool Bhulaiyaa 3 Song

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 3:54 PM IST

Bhool Bhulaiyaa 3 Song : 'भूल भुलैया 3' चित्रपटामधील कार्तिक आर्यनच्या ग्रँड एंट्री गाण्याची तयारी होत असल्याचं समजत आहे. या एंट्री गाण्यात तो 1000 डान्सर्सबरोबर डान्स करताना दिसणार आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Song
भूल भुलैया 3चं गाणं

मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 Song : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा हॉरर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहे. सध्या या चित्रपटची शुटिंग सुरू आहे. काही दिवसापूर्वीच कार्तिकनं 'भूल भुलैया 3' सेटचे दिग्दर्शक अनीस बज्मीबरोबरचे काही फोटो शेअर केले होते. 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिकबरोबर 'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती दिमरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये 'भूल भुलैया'ची मंजुलिका विद्या बालननं एंट्री घेतली आहे. आता 'भूल भुलैया 3' बाबत एक अपडेट आली आहे. या चित्रपटामधील कार्तिक आर्यनच्या ग्रँड एंट्री गाण्याची तयारी जोरदार सुरू असल्याचं समजत आहे.

'रुह बाबा' 1000 डान्सर्सबरोबर करणार डान्स : मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक गेल्या दोन आठवड्यांपासून त्याच्या एंट्री गाण्याची तयारी करत आहे. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य करणार आहे. या एंट्री गाण्यात कार्तिक 1000 बॅकग्राउंड डान्सर्सबरोबर थिरकताना दिसणार आहे. याआधी शाहरुख खाननं 'जवान' मधील 'जिंदा बंदा' गाण्यात 1000 डान्सर्सबरोबर डान्स केला होता. हे गाणं जबरदस्त हिट झालं होतं. आता सध्या सोशल मीडियावर कार्तिकच्या एंट्री गाण्याची खूप चर्चेत आहे. या गाण्याचे शूटिंग या आठवड्यात सुरू होणार आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'भूल भुलैया 3' चालू वर्षीच्या दिवाळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया' फ्रँचायझी खूप हिट ठरली आहे. 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार , शाइनी आहूजा आणि विद्या बालन हे मुख्य भूमिकेत दिसले होते. यानंतर 2022 रोजी प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आर्यनबरोबर कियारा अडवाणी दिसली होती. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर श्रद्धा कपूर, कतरिना कैफ हे कलाकार देखील आहेत. 'भूल भुलैया 3' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खाननं केलंय.

हेही वाचा :

  1. अंकिता लोखंडेच्या सासूचा दृष्टिकोन बदलला, चित्रपट प्रदर्शित होताच म्हणाली- 'माझी सून' - Ankita lokhande
  2. कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल... - Kangana Ranaut Birthday
  3. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' ट्रेलरसाठी काउंट डाऊन सुरू!! - Bade Miyan Chote Miyan Trailer
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.