ETV Bharat / bharat

लक्ष्मण भट्ट तैलंग, माया टंडन यांच्यासह अली-गनी मोहम्मद यांचा पद्मश्री पुरस्कारानं होणार गौरव, काय आहे योगदान?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 10:24 AM IST

Padma Shri Awards : पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची गुरुवारी (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली. जयपूरचे लक्ष्मण भट्ट तैलंग, डॉ. माया टंडन, मंद गायक अली आणि गनी मोहम्मद यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येणार आहे.

padma shri 2024 laxman bhatt tailang maya tandon ali and ghani mohammad will be honored
राजस्थानचे लक्ष्मण भट्ट तैलंग, माया टंडन आणि अली-गनी मोहम्मद यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार

जयपूर Padma Shri Awards : धृपद गायनाच्या कलेनं जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध करणारे पं.लक्ष्मण भट्ट तैलंग यांच्या साधनेचा गौरव करण्यात येत आहे. जयपूरचे लक्ष्मण भट्ट तैलंग यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय राजस्थानमधील मंड गायक अली मोहम्मद आणि गनी मोहम्मद जोडी आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. माया टंडन यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची गुरुवारी (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिक, व्यवसाय, उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा या क्षेत्रातील अपवादात्मक (असामान्य) सेवेसाठी पद्मविभूषण, उच्च दर्जाच्या सेवेसाठी पद्मभूषण आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते. यावर्षी 132 पद्म पुरस्कार दिले जातील. यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावेळी राजस्थानमधील तीन विद्वानांना पद्मश्री पुरस्कार मिळत आहे. यामध्ये 1928 साली जन्मलेले लक्ष्मण भट्ट तैलंग यांचा समावेश आहे. लक्ष्मण भट्ट यांना धृपद संगीताच्या शिक्षणाचा वारसा मिळाला. तोच वारसा त्यांनी आपल्या मुलांना दिला. त्यांची मुलगी मधु भट्ट तैलंग ही राजस्थानची पहिली महिला धृपद गायिका असून त्यांनाही पद्मश्री पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं आहे.

  • प्रजासत्ताकदिनच्यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला, अभिनेता चिरंजीवी, यांचा समावेश आहे.#PadmaAwards2024 pic.twitter.com/EjGxfPrWR3

    — AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 26, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वडिलांनी लिहिलेली पुस्तके विकायचे : मधु भट्ट तैलंग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं लक्ष्मण भट्ट तैलंग यांनी लहान वयातच आपल्या वडिलांनी (गोकुळ चंद्र भट्ट) लिहिलेली पुस्तकं विकायला सुरुवात केली. संघर्ष करतच त्यांनी संगीत महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढं त्यांनी रसमंजरी संगीतोपासना केंद्र आणि आंतरराष्ट्रीय धृपद धाम ट्रस्ट या संस्थाही सुरू केल्या. आज भारतीय शास्त्रीय संगीतातील धृपद शैलीतील गायकांमध्ये पं.लक्ष्मण भट्ट तैलंग यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. लक्ष्मण भट्ट तैलंग यांच्याशिवाय राजस्थानच्या डॉ. माया टंडन यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. 85 वर्षीय माया टंडन या जेके लोन हॉस्पिटलच्या माजी अधीक्षक होत्या. त्या रस्ता सुरक्षेसाठी काम करतात. तसंच सध्या त्या मदत संस्थेच्या अध्यक्षाही आहेत.

अली-गनी हे 'मांड' गायनाचे राजे : प्रसिद्ध मांड कलाकार अली मोहम्मद आणि गनी मोहम्मद यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी संयुक्तपणे निवड करण्यात आली आहे. बिकानेरच्या तेजरासर गावातील रहिवासी असलेल्या या भावांच्या जोडीनं मांड गायनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलंय. गझल गायकांना संस्मरणीय संगीत देण्याबरोबरच त्यांनी चित्रपटांनाही संगीत दिले आहे. दरम्यान, यंदा पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 30 महिला आहेत.

हेही वाचा -

  1. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणाचा करण्यात आला गौरव ?
  2. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर, पंतप्रधानांनी केले अभिनंदन
  3. मनोज जरांगे मनुवादी, त्यांचं आंदोलन फडणवीस आणि आरएसएसने प्रभावित; पद्मश्री लेखक लक्ष्मण माने यांची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.