ETV Bharat / bharat

राजधानीतील नवजात शिशु देखभाल रुग्णालयात भीषण आग, 6 मुलांचा मृत्यू - Delhi fire news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 7:41 AM IST

Updated : May 26, 2024, 7:52 AM IST

नवी दिल्लीतील विवेक विहारमध्ये शनिवारी रात्री बेबी केअर हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली. या आगीत रुग्णालय पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामध्ये जळून ६ नवजात बालकांचा मृत्यू झाला.

Delhi Fire
Delhi Fire (Source- ETV Bharat Reporter)

नवजात बालकांचा मृत्यू (Source- ETV Bharat Reporter)

नवी दिल्ली : राजधानीतील विवेक विहार परिसरात असलेल्या बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू करून अकरा नवजात बालकांची सुटका करण्यात आली. मात्र, 6 मुलांचा मृत्यू झाला. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.

अग्निशमन दलानं रुग्णालयातील आग आटोक्यात आणली आहे. आगीत रुग्णालय पूर्णपणे जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाले. यासोबतच रुग्णालयालगतच्या इमारतीलाही आग लागली. ही आग वेळीच आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आलं आहे.

आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश - सखोल चौकशीनंतरच आगीचे कारण समजेल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं. मात्र, स्फोटाच्या जोरदार आवाजानं रुग्णालयात आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रुग्णालयातील सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागून रुग्णालयात पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन अधिकाऱ्यानं सांगितलं की, हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री 11.32 वाजता विवेक विहार येथील बेबी केअर येथील आगीची माहिती मिळाली. सुमारे तासभर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

ऑक्सिजन रिफिलिंग दरम्यान सिलेंडरचा स्फोट- स्थानिक आमदार आणि दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयलही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, 11 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उर्वरित मुलांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोरदार स्फोटानंतर आग लागल्याचं भगतसिंग सेवा दलाचे अध्यक्ष पद्मश्री जितेंद्र सिंह शांती यांनी सांगितलं. ते म्हणाले, " रुग्णालयाबाहेर असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू होते. ऑक्सिजन रिफिलिंग दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला. एकापाठोपाठ तीन सिलिंडरचा स्फोट झाले. त्यामुळे आधी रुग्णालयात आणि त्यानंतर शेजारील इमारतीतही आग लागली."

हेही वाचा-

  1. दिल्लीतील अलीपूर मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव, 11 जणांचा होरपळून मृत्यू
  2. दिल्लीत आगीचं तांडव; घराला लागलेल्या भीषण आगीत सहा नागरिकांचा होरपळून मृत्यू
Last Updated : May 26, 2024, 7:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.