ETV Bharat / bharat

दिल्लीत आगीचं तांडव; घराला लागलेल्या भीषण आगीत सहा नागरिकांचा होरपळून मृत्यू

author img

By ANI

Published : Jan 19, 2024, 7:05 AM IST

Delhi Fire : दिल्लीतील पितमपुरा परिसरातील एका घराला लागलेल्या भीषण आगीत होरपळून सहा नागरिकांचा मृत्यू झाला. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं असून मृतदेह रोहिणी इथल्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Delhi Fire
संपादित छायाचित्र

नवी दिल्ली Delhi Fire : घराला लागलेल्या भीषण आगीत सहा नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री दिल्लीतील पितमपुरा परिसरात घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन या आगीवर नियंत्रण मिळवलं. घटनास्थळावर अद्यापही बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

आगीत होरपळून सहा नागरिकांचा मृत्यू : गुरुवारी रात्री पितमपुरा परिसरातील एका घराला आग लागल्याचं उघड झाल्यानंतर मोठी धावपळ झाली. आगीची घटना समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पितमपुरा परिसरातील घरात रात्री आठ वाजताच्या दरण्यान आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केलं. आग लागलेल्या घरात लोक अडकले होते. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी प्रथम आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकानं घरातून सहा जणांना बाहेर काढलं. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. त्यामुळं परिसरात मोठी खळबळ उडाली. या मृतांचे मृतदेह रोहिणी इथल्या आंबेडकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

आगीचं कारण गुलदस्त्यात : पितमपुरा परिसरातील घराला लागलेल्या आगीत सहा नागरिकांचा मृत्यू झाला. हा परिवार इथं भाड्यानं राहत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. त्यामुळं या परिवाराची सविस्तर माहिती मिळाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी सांगितलं. "पितमपुरा भागातील एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा जणांना तत्काळ बाहेर काढलं. अगोदर दोन जण मृत आढळले होते, त्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांची संख्या पाच झाली आहे" अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे अधिकारी एस के दुआ यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. मात्र त्यानंतर आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील गगनचुंबी इमारत पेटली, ११ व्या मजल्यावरील आग विझवण्यासाठी क्रेनची मदत
  2. दिल्लीत 'प्रिंटीग प्रेस'ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; शोधकार्य सुरू
  3. Delhi Fire : दिल्लीतील चांदनी चौकात दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.