ETV Bharat / bharat

दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील गगनचुंबी इमारत पेटली, ११ व्या मजल्यावरील आग विझवण्यासाठी क्रेनची मदत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 2:11 PM IST

Updated : Dec 21, 2023, 2:19 PM IST

Delhi Fire : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील गोपाल दास बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ११ व्या मजल्यावर ही आग लागली. इमारत खूप उंच असल्यानं आग विझवण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे.

Fire
Fire

नवी दिल्ली Delhi Fire : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील बाराखंबा रोडवर असलेल्या गोपाल दास बिल्डिंगला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहचले आहेत. आग इमारतीच्या ११व्या मजल्यावर लागली आणि काही वेळातच इमारतीच्या बाहेर धुराचे ढग दिसू लागले. सुदैवाने इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे.

  • #WATCH दिल्ली: बाराखंभा रोड स्थित गोपाल दास बिल्डिंग में आग लग गई। दमकल की गाड़ियां मौके पर मौजूद हैं। pic.twitter.com/xFSeRGMYqB

    — ANI_HindiNews (@AHindinews) December 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

११ व्या मजल्यावर आग लागली : लोकांना इमारतीपासून दूर राहण्यास सांगण्यात आलंय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांशिवाय इतर कर्मचाऱ्यांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आलंय. या इमारतीत अनेक कार्यालये आहेत. अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितलं की, दुपारी १ वाजताच्या सुमारास आगीचा कॉल आला. इमारतीच्या ११ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही.

आग विझवण्यासाठी क्रेनची मदत : इमारतीला आग लागल्यानंतर फायर अलार्म वाजला आणि लगेचच लोक इमारतीतून बाहेर येऊ लागले. त्यानंतर ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. इमारत खूप उंच असल्यानं अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी क्रेनची मदत घेत आहेत. कर्मचारी क्रेनच्या सहाय्यानं इमारतीच्या आत पोहोचून इमारतीच्या काचा फोडून आगीवर नियंत्रण मिळवत आहेत.

७० हून अधिक फायर फायटर्स दाखल : विभागीय अधिकारी राजेंद्र अटवाल, एडीओ रवींद्र, भूपेंद्र, एसटीओ परवीन, रवींद्र यांच्यासह अग्निशमन दलाचे ७० हून अधिक फायर फायटर्स घटनास्थळी आग विझवण्य़ात व्यस्त आहेच. मुख्य अग्निशमन अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

हे वाचलंत का :

  1. मुंबईत आगीच्या घटनेत वाढ; अग्निशमन विभागाची नवी नियमावली
  2. आगीमध्ये रोज लोक होरपळून मरतायत, सरकार मात्र ढिम्म, हलगर्जीपणा चालणार नाही - मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय
Last Updated : Dec 21, 2023, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.