Video : गोदावरी नदीला पूर; काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली, पूर बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

By

Published : Jul 12, 2022, 3:22 PM IST

thumbnail

नाशिक - नाशिकमध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला ( Nashik Godavari River Flood ) आहे. आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी नाशिकच्या गंगापूर धरणातून ( Gangapur Dam Nashik ) 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोदा पात्रातील लहान, मोठे मंदिर पाण्याखाली गेली आहेत. तसेच दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. नाशिकमध्ये रेड अलर्टमुळे सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना घेऊन गोदावरी नदीकाठी पूर बघण्यासाठी गर्दी करत आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या व्हिक्टोरिया पुलावर नागरिकांची सेल्फी काढण्यासाठी गर्दी होत आहे. अशात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कृपया करून नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असा आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.