ETV Bharat / politics

पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमदार रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन - Pune Hit And Run Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 3:15 PM IST

Pune Hit And Run Case : राज्यातील पुणे हिट अँड रन प्रकरण चांगलं तापलेलं दिसत आहे. पुणे लोकसभा संघाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हिट अँड रन प्रकरण आणि पब संस्कृतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

पुणे Pune Hit And Run Case : रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी पैसे घेऊन प्रकरण हाताळलं आहे. यामुळे तपास अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच पोलीस आयुक्तांची बदली करावी अशी, मागणी पुणे लोकसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी रेटून धरली आहे. एकटेच आंदोन करत त्यांनी या प्रकरणकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

प्रकरण फास्टट्रॅक कोर्टानं हाताळावं : मागील काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिट अँड रन प्रकरण उचलून धरलं आहे. ठिय्या आंदोलनादरम्यान ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी शहरातील अंमली पदार्थ तसंच पब संस्कृती याविषयी बोलतोय. हे सरकार गुन्हेगारांच्या बरोबर असून हिट अँड रन प्रकरण हाताळताना पोलिसांनी अनेक चुका केल्या आहेत. या प्रकरणाच्या दोन एफआयआर दाखल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये करोडो रुपयांचा व्यवहार केला जाणे ही बाब खात्याला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार नाही, तोपर्यंत मी पुण्यात ठिकठिकाणी जाऊन रोज आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांसमोर दोन मागण्या ठेवल्या आहेत. पहिली हे प्रकरण जलदगतीनं हातळावं आणि दुसरी म्हणजे तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्वरीत चौकशी करावी.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या प्रकरणी खुलं आवाहन करत धंगेकरांनी चर्चेला निमंत्रण दिलं आहे. याबाबत धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांनी मला चर्चेला बोलवावं, मी त्यांच्याकडे चर्चेला जायला तयार आहे. त्यांना जर दोन दोन एफआयआर कराव्या लागत असतील तर त्यांनी आरशात बघावं, चुकीच्या अधिकाऱ्याला भेटायला देखील मी जाणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा; रवींद्र धंगेकर यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं मागणी - Pune Hit And Run Case
  2. वाडेश्वर कट्ट्यावर रंगल्या गप्पा...पहा काय म्हणाले रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे - Wadeshwar Katta
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.