डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; एकनाथ शिंदेंची घोषणा - Dombivli MIDC Blast

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:32 PM IST

thumbnail
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Reporter)

ठाणे Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 8 जण ठार तर 64 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणाहून अग्निशमन दलाने 8 जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्यात आली. तसेच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितलं. घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यानी पाहणी करून डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. 



डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यामुळं शेजारील कंपन्या, दुकाने आणि रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरून तर स्फोटामुळं अनेक दुकानांच्या आणि रहिवासी इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. 2016 मध्ये याच ठिकाणी झालेल्या प्रोबेस स्फोटाची आठवण आजच्या या दुर्घटनेने झाली. ज्यामध्ये 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.