Shocking Video : 166 सेकंदाची मृत्युशी झुंज, पहा व्हिडिओ

By

Published : Jul 30, 2022, 2:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

thumbnail

चंद्रपूर - तलावावरील बंधाऱ्यावरून एक जण वाहून गेला आहे. तो अडकला असताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन जणांनी आपला जीव धोक्यात टाकला. हा मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात एक जण वाहून गेल्याची माहिती आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास जुनाना येथे घडली आहे. जुनोना तलाव तुडुंब भरल्याने त्यावर बांधलेले बंधारा देखील ओव्हरफ्लो झाला आहे. यात एक व्यक्ती वाहून गेला. त्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दोरीच्या साहाय्याने तो तग धरून होता. त्याला ओढण्याच्या प्रयत्नात दोघांचा तोल गेला. त्यातील एकाला कसेबसे पकडण्यात आले. मात्र दुसरा या प्रवाहात ओढला गेला आणि गटांगळ्या खायला लागल्या. त्याला वाचविण्यासाठी तिसऱ्याने उडी मारली आणि थोड्या वेळात तो देखील पाण्यात पडला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकोर्निया या वनस्पतीच्या झुडुपामुळे त्यांना स्वतः वाचविण्यास अडचण येत होती. यापैकी एक जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी कुणाचीही ओळख अद्याप पटू शकली नाही.

Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.