ETV Bharat / bharat

पोटच्या मुलाची आईनं गळा दाबून केली हत्या, कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का - Mother Murder Son In Gurugram

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 11:12 AM IST

Updated : May 17, 2024, 12:24 PM IST

Mother Murder Son In Gurugram : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका कलयुगी आईनं तिच्या आठ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाचे मळलेले कपडे बघून, राग अनावर झाल्यानं जन्मदात्या आईनं मुलाचा गळा घोटून खून केला.

mother murder son in gurugram sector 18 police arrested accused
गुरुग्राममध्ये आईने की मुलाची हत्या (ETV Bharat)

गुरुग्राममध्ये आईने केली मुलाची हत्या (ETV Bharat)

गुरुग्राम Mother Murder Son In Gurugram : राजधानी दिल्लीच्या नजीक असलेल्या गुरुग्राममध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीये. सेक्टर 18 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आईनं आपल्या आठ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. या मुलाचा दोष एवढाच होता की तो शाळेतून परत आला तेव्हा त्याचा ड्रेस मळलेला होता. तसंच तो शाळेत काही पुस्तकं विसरुन आला होता. मात्र, यामुळं संतापलेल्या आईनं त्याला बेदम मारहाण करून कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं. तसंच काही वेळानं मुलानं काहीतरी मिळवण्याचा हट्ट केला असता कलयुगीच्या आईनं त्याचा गळा दाबून खून केला.

आईनेच केली मुलाची हत्या : महिलेचा पती संध्याकाळी घरी परतला तेव्हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचं त्यानं पाहिलं. त्यानं घाईघाईनं मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, तिथं डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच सेक्टर-18 पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली. सध्या आरोपी महिलेची चौकशी सुरू आहे. गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेला स्वतःच्या मुलाची हत्या केल्याचा थोडाही पश्चाताप नाही.

शाळेचा ड्रेस घाणेरडा दिसल्यावर केली बेदम मारहाण : या घटनेसंदर्भात अधिक माहिती देत गुरुग्रामचे एसीपी वरुण दहिया यांनी सांगितलं की, महिला तिचा पती आणि आठ वर्षांचा मुलगा कार्तिकसह सेक्टर-18 पोलीस स्टेशन परिसरात राहते. महिलेचा पती अरविंद हा मजुरीचं काम करतो. 13 मे रोजी ही हत्येची घटना घडली. महिलेचा आठ वर्षांचा मुलगा शाळेत गेला होता. मुलगा कार्तिक दुपारी दोन वाजता घरी परतला. तेव्हा त्याचा शाळेचा गणवेश अस्वच्छ होता. आईनं विचारलं तेव्हा कळालं की त्याची काही पुस्तकंही हरवली आहेत. यावरुन महिलेनं आपल्या मुलाला बेदम मारहाण केली.

गळा दाबून खून : आरोपी महिलेनं मुलाचे कपडे काढून त्याला घराबाहेर उभं केलं. काही वेळानं कार्तिकनं आईकडं काहीतरी मिसळण्याचा हट्ट धरला. यावर महिलेचा राग अनावर झाला. तिनं कार्तिकचा गळा दाबून खून केला. अरविंद घरी पोहोचल्यानंतर त्याला कार्तिक बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यानंतर अरविंद आपल्या मुलाला घेऊन कल्याणी हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून यासंदर्भातील माहिती पोलिसांना कळवली. सेक्टर-18 पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. अरविंदच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली. आतापर्यंतच्या तपासात ही महिला रागीट स्वभावाची असल्याचं समोर आलंय. ती अनेकदा आपल्या मुलाला मारत असे. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून : प्रेमाला नकार दिल्यानं नराधमानं घरात घुसून तरुणीला भोसकलं - Girl Stabbed To Death
  2. उत्तर महाराष्ट्र केसरीची निर्घृण हत्या; अगोदर कोयत्यानं वार, मग मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या - Wrestler Killed In Nashik
  3. दुहेरी हत्याकांडानं अमरावती हादरली; जागेच्या वादातून शेजाऱ्याकडून आई, मुलाचा खून - Amravati Double Murder Case
Last Updated :May 17, 2024, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.