Ganesh Visarjan 2023: गणेशाच्या जयजयकारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला दिला निरोप

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:43 PM IST

thumbnail

मुंबई Ganesh Visarjan 2023: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी घरगुती गणेशाचे विसर्जन केले. अत्यंत पारंपरिक आणि पर्यावरण (Immersion of Ganesha) पूरक पद्धतीने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कृत्रिम तलावात गणेशाचे विसर्जन केले. (Deputy CM Fadnavis house) यावेळी सर्वांनी मिळून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा गजर केला. (Ganeshotsav at Devendra Fadnavis house)
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. (Immersion of Ganesh) दहा दिवस गणरायांची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशी निमित्त आज (गुरुवारी) गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस यांनी अत्यंत भावूक अंत:करणाने 'गणपती बाप्पा मोरया...'चा गजर केला. तत्पूर्वी सर्व कुटुंबीयांनी एकत्र मिळून श्री गणरायाची आरती केली. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी समुद्रामध्ये श्री गणेशाचे विसर्जन न करता घरातच तयार केलेल्या कृत्रिम तलावात अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भाऊकतेने गणरायांचे विसर्जन केले. यावेळी बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असेल याच विश्वासाने पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.