पारशिवनी परिसरात दहशत पसरवणारा वाघ जेरबंद; वन विभागानं रेस्क्यू केल्यानंतर उपचारादरम्यान वाघाचा मृत्यू - Tiger Died In Gorewada

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 12:26 PM IST

thumbnail
वन विभागानं जेरबंद केल्यानंतर वाघाचा मृत्यू (Reporter)

नागपूर Tiger Died In Gorewada : गेल्या अनेक दिवसांपासून पारशिवनी तालुक्यातील काही गावात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली. या वाघाला बंदिस्त करण्यात वन विभागाला रविवारी यश आलं. मात्र, सोमवारी या वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील चिचभूवन, नयाकुंड, माहुली, उमरी, काळापाठा, मेहंदीसह काही गावांमध्ये वाघानं अक्षरशः धुमाकूळ घातला. रोजच्या रोज वाघाची दहशत वाढत होती. शेतकऱ्यांच्या गोठ्यातील अनेक जनावरांचा फडशा वाघानं पाडला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. रविवारी वन विभागाने पेंच नदीच्या किनाऱ्यावरील पालोरा आणि नयाकुंड या भागात वाघानं शिकार केल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला समजली. या माहितीच्या आधारे त्या भागात वनव विभागाच्या वतीनं सापळा रचण्यात आला. या सापळ्यात अलगद वाघ अडकला. पारशिवनीतील अनेक गावांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या वाघाला जेरबंद केल्यानंतर त्याची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये करण्यात आली. मात्र सोमवारी या वाघाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.