Dinesh Lad : 'रोहितला १३० कोटी जनतेचा आशीर्वाद, भारत वर्ल्डकप जिंकणारच'; रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांच्याशी खास बातचित
मुंबई Dinesh Lad : देशात सध्या क्रिकेट विश्वचषकाची धूम आहे. मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिली. टीमचे सर्वच खेळाडू विजयात योगदान देत असून रोहितच्या नेतृत्वगुणांचं देखील कौतूक होत आहे. रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी केलेल्या खास संभाषणात हा विश्वचषक भारतच जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. "वर्ल्डकप भारतच जिंकणार. रोहित शर्मा ज्या पद्धतीनं संघाचं नेतृत्व करत आहे, ते पाहता आता त्याच्याकडून भारताला विश्वचषकाची भेट मिळेल. भारतीय संघाच्या टीमवर्क मुळे विश्वचषक जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. याशिवाय १३० कोटी जनतेचा आशिर्वाद देखील रोहित शर्माच्या पाठीशी आहे. त्यामुळे भारतच हा वर्ल्डकप जिंकेल", असं दिनेश लाड म्हणाले. पाहा हे खास संभाषण.
Loading...