Devendra Fadnavis video Means: 'त्या' व्हिडिओचा अर्थ एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा मिळून पुन्हा मी येईन - संजय गायकवाड

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 5:12 PM IST

thumbnail

बुलडाणा : काल भाजपाच्या ट्विटर हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईल महाराष्ट्राच्या सेवेकरिता' अशा प्रकारचा एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला व तो व्हायरल झाला. त्यानंतर यावर चर्चांना उधाण आलं. राज्यात सत्तांतर होणार का? मुख्यमंत्री बदलणार का? (MLA Sanjay Gaikwad) असं विरोधक देखील बोलू लागले आणि आपली प्रतिक्रिया देऊ लागले. यावर बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वक्तव्य केलं आहे. यामध्ये त्यांनी संजय राऊत यांचा देखील समाचार घेतला आहे. (CM Eknath Shinde) त्या व्हिडिओचा अर्थ म्हणजे, एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे मिळून आम्ही पुन्हा येऊ असा होत आहे. (Ajit Pawar) आपण त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये, असं संजय गायकवाड म्हणाले. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर बोलताना त्यांची जीभ घसरते. त्यांना फुटक्या चष्म्यातून दिसत नाही. त्यांनी अनेक वेळा भविष्यवाणी केली आहे. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं संजय गायकवाड यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis Viral Video)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.