ETV Bharat / sukhibhava

Weight Loss home workouts : पोटाबरोबर कमरेचा आकार दुपटीने वाढलाय? करा हे सोपे घरगुती वर्कआउट्स

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 12:05 PM IST

Weight Loss home workouts : तुमच्या व्यग्र जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी काही घरगुती वर्काउट्स तुम्हाला मदत करू शकतील. थोड्याशा शारीरिक हालचाली केल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या काय आहेत घरगुती वर्कआउट्स...

Weight Loss home workouts
घरगुती वर्कआउट्स

हैदराबाद : Weight Loss home workouts वाढत्या वजनामुळे त्रास होतोय. वजन कमी करायचं आहे. पण आळसामुळे ते शक्य होत नाह, जर तुम्हाला जिममध्ये जाण्याचा आळस वाटत असेल तर घरीच वर्कआउट करा. जर तुम्ही तुमचं वजन आता नियंत्रित केलं नाही तर ते दिवसेंदिवस वाढत जाईल. वाढत्या वजनामुळे शरीराचा आकार तर बिघडतोच पण त्याचबरोबर अनेक आजारही होतात. आळशीपणामुळे तुम्ही कधीही वजन कमी करू शकत नाही.

वर्कआउट केल्याने तुमचा मूड सुधारेल : जर तुम्हाला जीममध्ये जाण्यास संकोच वाटत असेल तर वजन कमी करण्याचे काही सोपे व्यायाम घरीच्या घरी करा. हृदय निरोगी राहण्यासाठी काही व्यायाम आहेत, ज्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. हे व्यायाम तुम्ही घरीच करू शकता. काही वर्कआउट्स केल्याने तुमचा मूड सुधारेल आणि वजन लवकर कमी होईल. थोड्याशा शारीरिक हालचालींमुळे तुमचं वजन कमी होण्यास सुरूवात होते. काही घरगुती वर्कआउट्स तुम्हाला तुमच्या व्यग्र जीवनात तंदुरुस्त राहण्यास मदत करू शकतात. हे व्यायाम केल्याने तुमचा स्टॅमिना आणि ताकद वाढते. आम्ही तुम्हाला काही सोप्या वर्कआउट्स सांगत आहोत, जे तुम्ही आळशी असाल तरीही करू शकता.

सोपे बॉडी वेट एक्सरसाइज : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर घरच्या घरी काही सोपे बॉडी वेट एक्सरसाइज करा. स्क्वॅट्स, पुश-अप्स, लंग्ज, प्लँक्स आणि ग्लूट ब्रिजसारखे व्यायाम प्रत्येकी 45 सेकंदांसाठी करा. हे केल्यानंतर 15 सेकंद विश्रांती घ्या. पूर्ण-शरीर व्यायामासाठी या सर्किटची तीन ते चारवेळा पुनरावृत्ती करा. हे व्यायाम केल्याने मेटाबॉलिज्मला चालना मिळते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

योग करा किंवा बेसिक स्ट्रेचिंग करा : योग आणि स्ट्रेचिंगमुळे स्नायूंचा ताण कमी होतो. हे व्यायाम शरीरावर प्रभावीपणे परिणाम करतात. असं केल्याने शरीरातील चरबी कमी होते. हे व्यायाम अधिक कार्यक्षमतेनं कॅलरी बर्न करतात. योगासने आणि स्ट्रेचिंग व्यायामामुळे तुमचं शरीर लवचिक बनतं आणि तुमच्या शरीरात चांगले कार्य करण्याची क्षमता निर्माण होते. श्वास घेणे आणि श्वास सोडण्याचे व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होईल.

नृत्य करा : तुमचे आवडते संगीत चालू करा आणि दररोज नृत्य करा. तुम्हाला माहीत आहे की नृत्य केल्याने कॅलरी फास्ट बर्न होतात आणि हृदय देखील निरोगी राहते. वेगवेगळ्या नृत्यशैली आणि त्याची तीव्रता तुमच्या शरीरातील कॅलरी जलद बर्न करतात. किमान 20-30 मिनिटे डान्स करा मग एका महिन्यात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.

दहा मिनिटे कार्डिओ व्यायाम : वजन कमी करायचे असेल तर दहा मिनिटे कार्डिओ व्यायाम करा. कार्डिओ व्यायामामध्ये जंपिंग जॅक, उंच गुडघे आणि माउंटन क्लाइंबर व्यायाम यांचा समावेश करा. लक्षात ठेवा की तुम्ही यापैकी प्रत्येक व्यायाम 30 सेकंदांसाठी कराल. दोन व्यायामांमध्ये तुम्ही 10 सेकंद विश्रांती घेऊ शकता. 10 मिनिटांच्या उत्साही व्यायामासाठी या सर्किटची तीनवेळा पुनरावृत्ती करा. ह्रदयाच्या व्यायामामध्ये तुम्ही जंपिंग जॅक, पायऱ्या चढणे, सायकल चालवणे आणि नृत्य यांसारखे व्यायाम करू शकता.

हेही वाचा :

  1. Coconut for hair : फक्त तेलच नाही तर नारळपाणी देखील बनवते केसांना निरोगी; वाचा कसं वापरायचं ते...
  2. Dragon Fruit Benefits : अनेक आजारांपासून वाचवते ड्रॅगन फ्रूट; जाणून घ्या काय आहेत फायदे...
  3. Phlegm in Throat : घशात सारखा कफ येतोय किंवा सतत उलटी, मळमळ जाणवतेय? फॉलो करा 'या' टिप्स...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.