ETV Bharat / sukhibhava

Phlegm in Throat : घशात सारखा कफ येतोय किंवा सतत उलटी, मळमळ जाणवतेय? फॉलो करा 'या' टिप्स...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 11:13 AM IST

Phlegm in throat
घशात सारखा कफ येतोय

Phlegm in throat : शरीरातील कफ कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय मदत करू शकतात. अशावेळी पातळ पदार्थ खाणे, नाकात स्प्रे टाकणे आणि गुळण्या केल्याणे बराच आराम मिळतो.

हैदराबाद : Phlegm in throat ऋतुनुसार आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. कोणत्याही ऋतुत थंड पदार्थ खाल्याने सर्दी होते. त्यामुळे घशात आणि छातीत कफ होवू लागतो. थंड पदार्थ खाण्यापिण्यावर नियंत्रण नाही ठेवल्यास घशात कफ येवू लागतो. त्यामुळे उलटी येणे, मळमळ होणे सतत जाणवते. शरीरात कफ वाढल्याणे घसा खवखवणे, दुखणे, छाती जड होणे, डोकेदुखी अशा अनेक समस्या वाढू लागतात. कफ कमी करण्यासाठी कफ सिरप पिल्याने दिवसभर झोप येते, तसेच अशक्तपणा देखिल येतो. अशावेळी काही घरगुती उपाय खुप प्रभावी ठरतात. ज्यामुळे तुम्ही सहजपणे कफ कमी करू शकता. जाणून घ्या काय आहेत उपाय....

  • जास्त प्रमाणात पातळ पदार्थ खा : जर घशात कफ अडकत असेल तर जास्त प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करा. द्रव पदार्थ कफ पातळ करण्यास आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. जेव्हा शरीरात जास्त कफ असतो तेव्हा पातळ पदार्थ पिण्याने कफ पातळ होऊ शकतो. पातळ पदार्थांपैकी आपण कोमट पाणी पिऊ शकता. तुम्ही कोमट सूप आणि आल्याचा चहा देखिल घेऊ शकता.
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या करा : मीठ पाणी घसा खवखवणे शांत करू शकते. घशात अडकलेला कफ साफ करण्यास मदत करू शकते. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचे मीठ मिसळून तुम्ही दिवसातून अनेक वेळा गुळण्या करू शकता. गुळण्या हे औषधांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. यामुळे घशाला आराम मिळतो आणि घशात अडकलेला कफही बाहेर येतो.
  • गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर घ्या : गरम पाण्याने थोडा वेळ आंघोळ केल्यास नाक आणि घशातील कफ सैल होऊन घसा साफ होईल. चेहऱ्याला कोमट पाणी लावल्याने सायनसचा दाब कमी होण्यास मदत होते.
  • कोमट पाण्याने नियमित वाफ घ्या : घशात जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी, आपण दिवसातून एक किंवा दोनदा कोमट पाण्याची वाफ घेणे आवश्यक आहे. गरम पाण्याची वाफ घेतल्याने कफ सैल होतो आणि मलमार्गे शरीराबाहेर जातो. वाफ येण्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी नीट उकळून घ्या. टॉवेलने चेहरा झाकून वाफ घ्या. यामुळे कफची समस्या कमी होऊ शकते.
  • हळदीचे दूध प्या : जर तुम्हाला कफचा त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचे दूध प्या. हळद औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे जी कफ काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन शरीर निरोगी राहते. दुधासोबत हळदीचे सेवन केल्याने कफ कमी होतो आणि घसा साफ होतो.

हेही वाचा :

  1. Stretch Exercise : 'या' स्ट्रेचिंग एक्सरसाइजने करा दिवसाची सुरुवात; शरीरातील जडपणापासून मिळेल आराम...
  2. Frizzy Hair Tips : तुमचे केस झोपेतून उठल्यावर कोरडे दिसतात? आजच बदला 'या' सवयी
  3. Blood deficiency in women : महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेने दिसतात ही लक्षणे; करू नका दूर्लक्ष...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.