ETV Bharat / entertainment

वयाच्या 13 व्या वर्षी फोटो ॲडल्ट साइटवर झाले होते लीक...; जान्हवी कपूरनं केला धक्कादायक खुलासा - JANHVI KAPOOR SEXUALISED AT 13

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 7:44 PM IST

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत वयाच्या 12 आणि 13 व्या वर्षी तिचे काही फोटो एका ॲडल्ट साइटवर अपलोड करण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा तिनं केला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर ((जाह्नवी कपूर - instagram ))

मुंबई Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीनं तिच्या बालपणीचा मोठा खुलासा केला आहे. जान्हवीनं वयाच्या 12 आणि 13 व्या वर्षी फोटो अडल्ट साईटवर पोस्ट केल्याबद्दल खुलासा केला आहे. करण जोहरशी बोलताना तिनं म्हटलं, "जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की हे सर्व मीडियानं केलं आहे, तेव्हा मला वाटते की मी 12-13 वर्षांची होती. मी आई बाबांबरोबर एका कार्यक्रमाला गेली होती, तिथे माझे काही फोटो काढण्यात आले होते. यानंतर हे फोटो अडल्ट साईटवर पोस्ट करण्यात आली. त्यामुळे माझ्या शाळेतील मुलं आणि मुली माझ्यावर हसत होते."

जान्हवी कपूरनं केला खुलासा : जान्हवी कपूरनं पुढं सांगितलं, "या सगळ्याला सामोरे जाणं खूप कठीण आहे. हा खूप वाईट अनुभव होता. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' या चित्रपटामध्ये एका पती आणि पत्नीची सुंदर प्रेमकहाणी दाखवली जाणार आहे. दरम्यान 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील 'देखा तेनू' हे पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलं होतं. हे गाणं अनेकांना आवडलं आहे.

जान्हवी आणि राजकुमारचं वर्कफ्रंट : 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मध्ये जान्हवी कपूर एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तिचा पती राजकुमार राव क्रिकेट खेळण्यासाठी तिला प्रोत्साहन देतो. यानंतर ती क्रिकेट खेळते आणि खूप यशस्वी खेळाडू बनते. या चित्रपटाचं शीर्षक दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला समर्पित आहे. धोनीला 'माही' नावनं देखील ओळखल्या जाते. जान्हवी कपूरनं 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. दरम्यान जान्हवी आणि राजकुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'देवरा पार्ट 1' चित्रपटात साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरबरोबर दिसणार आहे. याशिवाय ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि तख्त या चित्रपटांमध्ये दिसेल. दुसरीकडे राजकुमार हा 'स्त्री 2'मध्ये श्रद्धा कपूरबरोबर झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्टी 1'मधील 'फिअर' गाणं आज संध्याकाळी होणार रिलीज, पाहा पोस्ट - DEVARA PART 1
  2. ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासह कानमधून मुंबईत परतली, व्हिडिओ व्हायरल - CANNES 2024
  3. आरसीबी आयपीएल प्लेऑफमध्ये सामील झाल्याचा आनंद मावेना! अनुष्का शर्मासह विराट कोहली झाले भावूक - anushka sharma and virat kohli
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.