ETV Bharat / sukhibhava

Increase Hemoglobin Level : डेंग्यू तापात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली? तुम्हीही खाऊ शकता 'हे' पदार्थ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 1:49 PM IST

Increase Hemoglobin Level : सध्या देशभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. डेंग्यू हा डास चावल्यानं पसरणारा एक प्राणघातक रोग आहे. वेळेवर उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकतं. डेंग्यूमध्ये अनेकदा प्लेटलेट्स कमी होतात. अशा परिस्थितीत तुम्ही या पदार्थांच्या मदतीनं हिमोग्लोबिनची पातळी वाढवू शकता.

Increase Hemoglobin Level
हिमोग्लोबिन पातळी

हैदराबाद : सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागांत त्याची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. डेंग्यू हा डास चावल्यानं पसरणारा एक प्राणघातक रोग आहे. डेंग्यूमुळे शरीरात प्लेटलेट्सची कमतरता असते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळं हिमोग्लोबिनची पातळी देखील कमी होऊ शकते.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया होतो : जेव्हा आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, तेव्हा शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळणं कठीण होतं. ज्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो आणि त्यामुळं थकवा, चक्कर येणं, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं, त्वचा पिवळी पडणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया होतो. अशा परिस्थितीत हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी तुम्ही आहारात बदल करू शकता जे त्याच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. जाणून घ्या हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे पदार्थ.

व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न : शरीराला लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी एक माध्यम आवश्यक आहे. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री, शिमला मिरची, टोमॅटो, द्राक्षे, बेरी इत्यादींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

लोहयुक्त पदार्थ : लोहाची कमतरता हे हिमोग्लोबिन पातळी कमी होण्याचं एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात लोहयुक्त हिरव्या भाज्या, टोफू, पालक, अंडी, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि बीन्स, मांस, मासे, सुका मेवा इत्यादींचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे.

फॉलिक ऍसिडचं सेवन महत्वाचं आहे : फॉलिक ऍसिड हे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व आहे जी आपल्या शरीरात लाल रक्तपेशी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळं हिमोग्लोबिनच्या पातळीवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत हिरव्या भाज्या, अंकुरलेले धान्य, शेंगदाणे, केळी, ब्रोकोली इत्यादी पदार्थ खा.

बीटरूट खा : बीटरूट तुमची हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यास मदत करतं तसेच लाल रक्त पेशी सक्रिय करतं. त्यात भरपूर लोह असतं. तुम्ही सलाड किंवा भाजी म्हणून खाऊ शकता. ज्यूसच्या स्वरूपातही सेवन करू शकता.

मणूक्यांचा रस : मणूका हे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर तसेच कॅल्शियम आणि लोह यांचा चांगला स्रोत आहे. जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर रोज एक ग्लास बेदाणा रस प्या किंवा फ्रूट सॅलड आणि रायत्याच्या रूपात खा.

हेही वाचा :

  1. World Vegetarian Day 2023 : जागतिक शाकाहारी दिवस 2023; 'हे' शाहकारी पदार्थ आहेत प्रथिनांचं भांडार...
  2. Tulsi Oil Benefits : केसांच्या समस्येपासून हैराण आहात? वापरून पाहा तुळशीचं तेल...
  3. Nails Care Tips : सारखं नखं तुटण्याचा होतोय त्रास ? करा 'हे' उपाय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.