ETV Bharat / sukhibhava

Healthy stomach : तुम्हालाही ठेवायचय नेहमी पोट निरोगी ? तर मग करू नका या चुका...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 11:00 AM IST

Healthy stomach : आजकाल लहानांनपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे पोटाला निरोगी ठेवणं कठीण झालं आहे. यामागे अनेक कारणं असली तरी अशा परिस्थितीत तुम्ही या चुका कधीच करू नकात होतील वाईट परिणाम...

Healthy stomach
पोट निरोगी

हैदराबाद : Healthy stomach पोटाचं आरोग्य राखणं आपल्या एकूण शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. आपली पचनसंस्था चांगली पचन, पोषक तत्वांचे शोषण आणि रोगप्रतिकारक शक्तीचं योग्य कार्य यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. अनेकदा लोक जीवनशैलीत अनेक चुका करतात ज्यामुळं त्यांच्या पोटाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळं तुम्हालाही तुमचं पोट नेहमी निरोगी ठेवायचं असेल तर काही चुकांपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे.

पुरेशी झोप न घेणं : पुरेशी झोप न मिळणं हे तुमच्या पोटासाठी तसेच एकूण शरीरासाठी खूप धोकादायक मानलं जातं. अयोग्य झोपेमुळं पोटातील बॅक्टेरियाचं संतुलन बिघडतं. 7 ते 9 तासांची पूर्ण झोप घेणे महत्त्वाचं आहे.

अपुरे हायड्रेशन : डिहायड्रेशनमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळं पचनसंस्थाही नीट काम करत नाही. पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी हायड्रेटेड राहणं फार महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी पिणं महत्त्वाचं आहे.

आहाराशी संबंधित चुकीच्या गोष्टी निवडणे : बहुतेक लोक करतात त्या सर्वात मोठी चूक म्हणजे खराब आहार. कमी फायबर, जास्त चरबी, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचा आहार पोटासाठी खूप हानिकारक आहे. अशा गोष्टींमुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. अशा परिस्थितीत पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि आंबवलेले पदार्थ यांचा समावेश करा.

फायबरची कमतरता : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायबर खूप महत्वाचं मानलं जातं. आतड्याची हालचाल आणि बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत होते. याशिवाय हे पोटात असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करतं. बरेच लोक कमी प्रमाणात फायबरचं सेवन करतात जे तुमच्या पोटासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत शक्य तितकं संपूर्ण धान्य, कडधान्यं, फळं आणि भाज्यांचं सेवन करा.

तणाव आणि चिंता : तणाव आणि चिंता यांचाही पोटाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी तुम्ही तणाव कमी करणारे व्यायाम आणि योगासनं करणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा :

  1. Aloe Vera juice : कोरफडीचा रस आहे आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे
  2. Raw Milk benefits : कच्चं दूध पिल्यानं होतात हे फायदे...घ्या जाणून
  3. Kesar Tea Benefits : केशर चहा प्यायल्यानं होतात 'हे' आरोग्य फायदे; पण बनवताना करू नका ही चूक...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.