ETV Bharat / sukhibhava

Kesar Tea Benefits : केशर चहा प्यायल्यानं होतात 'हे' आरोग्य फायदे; पण बनवताना करू नका ही चूक...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 11:53 AM IST

Kesar Tea Benefits : जर तुम्हालाही दुधाचा चहा पिण्याचा कंटाळा आला असेल तर केशर चहाचा आहारात समावेश करा. या चहाच्या सेवनानं हंगामी आजारांचा धोका कमी होतो. जाणून घ्या काय आहे फायदे...

Kesar Tea Benefits
केशर चहा

हैदराबाद : Kesar Tea Benefits केशर हा एक असा मसाला आहे, जो महाग असला तरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वृद्ध लोक गर्भधारणेदरम्यान ते खाण्याची शिफारस करतात. ते खाल्ल्यानं स्त्रीला तसेच गर्भाला अनेक फायदे होतात. केशरमध्ये सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, लोह आणि व्हिटॅमिन सी यांसारखं अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनानं शरीरातील अशक्तपणा तर दूर होतोच शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते. केशर मिठाई, दूध आणि खीरमध्ये घालून खाल्ले जाते. पण केशर चहा देखील बनवून सेवन करता येतो. हा चहा स्वादिष्ट असण्यासोबतच तो प्यायल्यानं शरीरातील अनेक आजार दूर होतात. हा चहा प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होईल आणि रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होईल.

हृदयासाठी चांगले : केशर चहा प्यायल्यानं हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका कमी होतो. हा चहा प्यायल्यानं हृदय निरोगी राहते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते.

मासिक वेदना कमी करत : केशर चहा प्यायल्याने महिलांच्या मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. हा चहा प्यायल्याने पेटके, सूज, चिडचिड आणि थकवा यापासूनही आराम मिळतो. या चहामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या कमी होतात.

रोग प्रतिकारशक्ती मजबूत होतात : केशर चहा प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. केशरमध्ये व्हिटॅमिन सी, बी, रिबोफ्लेविन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे मौसमी आजारांचा धोका कमी होतो. हा चहा प्यायल्यानं शरीरातील सूज दूर होते.

तणाव मुक्त : केशर चहा प्यायल्यानं तणाव दूर होण्यास मदत होते. हा चहा तणावाची लक्षणं कमी करून मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतो. केशर चहा केवळ मूड सुधारत नाही तर शरीराची ऊर्जा पातळी देखील वाढवतं.

दृष्टीसाठी फायदेशीर : केशर चहामध्ये व्हिटॅमिन ए आढळतं, ज्यामुळं दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते. हा चहा प्यायल्यानं डोळ्यांच्या समस्या कमी होतात आणि डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात. अशा लोकांनी केशर चहा नक्कीच प्यावा. ज्याची दृष्टी कमी होत आहे.

केशर चहा कसा बनवायचा :

साहित्य :

  • १ कप पाणी
  • 4 ते 5- केशराचे धागे

बनवण्याची पद्धत :

  • केशर चहा बनवण्यासाठी पाणी हलके गरम करा. आता त्यात केशराचे धागे टाका आणि पाणी २ ते ३ मिनिटे उकळा. आता चहा गाळून घ्या आणि थंड झाल्यावर प्या.
  • केशर चहा शरीरासाठी फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला कोणताही आजार किंवा अॅलर्जीची समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करा.

हेही वाचा :

  1. Benefits Of Makhana : मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या
  2. Benefits of Roasted chana : फुटाणे आहेत अनेक समस्येवर रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
  3. Orange Peel Benefits : संत्र्याची साल त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर; जाणून घ्या फायदे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.