ETV Bharat / state

Tuberculosis Test : मिठाईच्या दुकानात कर्मचाऱ्यांची होणार क्षयरोगाची चाचणी; अभिनव संकल्पनेला ठाण्यातून सुरुवात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 5:47 PM IST

Updated : Nov 2, 2023, 9:23 PM IST

Tuberculosis Test : दिवाळी सणाच्या (Diwali 2023) पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ठाणे महापालिकेनं (Thane Municipal Corporation) ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी 'क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान' राबविण्यास सुरूवात केली आहे.

Tuberculosis Free Sweet Shop Campaign Started
दुकानात क्षयरोगाची चाचणी

मिठाईच्या दुकानात होणार कर्मचाऱ्यांची क्षयरोगाची चाचणी

ठाणे Tuberculosis Test : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2023) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारांमध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. तेथील पदार्थ विकत घेत असताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं (Thane Municipal Corporation) अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोग चाचणी सुरू केली आहे.

क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ : गेल्या काही वर्षात ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये (Tuberculosis patients) लक्षणीय वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलं आहे. या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या काही दिवसातच जर त्याचं निदान झालं तर त्यावर नियंत्रण मिळविणं सोपं जातं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं त्या दिशेनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. क्षयरोग हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे. समाजामध्ये त्याविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागीलवर्षी ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाचे 8500 हून अधिक रुग्ण आढळून आले होते. ज्यापैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये पण 7556 रुग्ण आढळले ज्यापैकी पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत.

दुकानांमध्ये रुग्ण शोधण्याची मोहीम : दिवाळीमुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. जर एखादा कर्मचारी संक्रमित असेल तर ग्राहकांना देखील त्याची लागण होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. बुधवारपासून शहरातील दुकानांमध्ये क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. यासाठी आठ जणांची टीम तैनात केली आहे. दुकानातच कर्मचाऱ्यांचे एक्स-रे काढणाऱ्या पोर्टेबल मशीनची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना आजाराबाबत माहिती देऊन त्यांचं प्रबोधन देखील करण्यात येत आहे. क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून या चाचण्यांमुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळणार आहे. तसंच त्याचं ग्राहकांना संक्रमणही होणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर त्या दुकानावर 'टीबी फ्री शॉप' चं स्टिकर देखील लावण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.



नोंद केली नाही तर होते कारवाई : क्षय रुग्णांची नोंद न केल्यास संबधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (1860च्या 45) च्या कलम 269 आणि 270 च्या अतंर्गत शिक्षा होऊ शकते.औषध विक्रेत्यांसाठी-आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, नवी दिल्ली दिनांक 30 ऑगस्ट 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रशाधने कायदा 1945 या मध्ये सुधारणा करुन क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.



रुग्णांना मिळते आर्थिक मदत : समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. क्षयरुग्णांना पूर्णपणे बरे करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कार्यक्रमातंर्गत विविध सुविधा व उपक्रम राबविले जातात उदा: निक्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांच्या नोदणीची सोय, नि:शुल्क रोगनिदान व औषधोपचार, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णांना पूर्ण बरे होईपर्यंत रु.500 पोषण आहारासाठी अर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिक रु. 500 मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा रु. 500 मानधन, क्षयरुग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहाय्यकास ड्रग सेसिंटिव्ह क्षयरुग्णामागे रु.1000 व एमडीआर रु. 5000 मानधन, रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी रु.500 मानधन इ. सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्याचे औषधोपचार योग्य व पूर्णपणे घेणे व तो बरा होणे हा उद्देश आहे.

हेही वाचा -

  1. Zika Virus: मुंबई शहरात आढळलाय 'झिका विषाणू'चा रुग्ण, बृहन्मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर
  2. Show Cause Notice To Teachers: आदिवासी विकास विभागाच्या 12725 शिक्षकांना मिळणार 'कारणे दाखवा' नोटीस; नेमकं काय आहे कारण...
  3. Pregnancy test : निवारागृहात प्रवेश दिलेल्या प्रत्येक महिला किंवा मुलीची केली जाणार गर्भधारणा चाचणी
Last Updated : Nov 2, 2023, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.