ETV Bharat / state

Show Cause Notice To Teachers: आदिवासी विकास विभागाच्या 12725 शिक्षकांना मिळणार 'कारणे दाखवा' नोटीस; नेमकं काय आहे कारण...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 7:21 PM IST

Show Cause Notice To Teachers
डॉ. विजयकुमार गावित

Show Cause Notice To Teachers : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा याकरिता आदिवासी विकास विभागाच्या वतीने दर तीन महिन्याला विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचीही क्षमता चाचणी घेतली जात आहे; परंतु शिक्षकांनी चाचणीस विरोध दर्शवला आहे. अलीकडेच झालेल्या चाचणीत 13 हजार पैकी फक्त 511 शिक्षक उपस्थित होते. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गैरहजर शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षकांच्या चाचणीविषयी मत मांडताना डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार Show Cause Notice To Teachers : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा याकरता आदिवासी विकास विभागाच्या वतीने दर तीन महिन्याला विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. या क्षमता चाचणीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांची देखील क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. शिक्षकांच्या पहिल्या क्षमता चाचणीत 13000 पैकी फक्त 511 शिक्षकांनी क्षमता चाचणी दिली आहे. यामुळे आता आदिवासी विकास विभाग 'ॲक्शन मोड'मध्ये आल्याचं दिसून येत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गैरहजर शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजाविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. तर काही शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

परीक्षेची पुन्हा संधी मिळणार : क्षमता चाचणीस अनुउपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून पुन्हा परीक्षेची संधी देणार असं मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये जवळपास 13 हजार शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. या शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतला होता. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला 13000 पैकी फक्त 511 शिक्षक उपस्थित होते. विविध शिक्षक संघटनांनी या क्षमता चाचणीला विरोध दर्शवला होता. या चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजविण्यात येणार आहे. नोटीसीनंतर शिक्षकांना परीक्षेची एक संधी देण्यात येणार आहे. मात्र, दुसऱ्या वेळेस ही परीक्षा न देणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला आहे.

शिक्षक संघटनांचा विरोध : येत्या काळात आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक संघटना आणि सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, या क्षमता चाचणीस अनेक संघटनांनी विरोध दर्शवला असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिक्षक संघटना काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा:

  1. Ashram School Principal Suspension: क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना एकाच वाहनात कोंबले; विजयकुमार गावितांनी मुख्याध्यापकाचे केले निलंबन
  2. Amravati Tribal Student Protest आदिवासी विद्यार्थ्यांचा रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, महर्षी पब्लिक स्कूलच्या कारभारावर आक्षेप
  3. Droupadi Murmu Victory Celebration : द्रोपदी मुर्मू झाल्या राष्ट्रपती.. 400 आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आनंदोत्सव साजरा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.