ETV Bharat / state

​Railway Passenger Robbery Case: रेल्वे प्रवाशी महिलेवर कैचीनं वार करून दागिने, मोबाईल पळविणारा चोरटा गजाआड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 6:22 PM IST

Railway Passenger Robbery Case
चोराला अटक

Railway Passenger Robbery Case: रेल्वे प्रवाशी महिला रेल्वे रुळ पार करीत असताना एका चोरट्याने तिचा पाठलाग करून तिच्यावर कैचीने हल्ला (Woman stabbed with scissors) केला. यानंतर त्यांने महिलेकडील दागिने व मोबाईल लुटून पळ काढला. रेल्वे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अवघ्या काळी वेळातच चोरट्याला मुद्देमालासह अटक केली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या हद्दीत काल (शुक्रवारी) घडली. संध्या नागराळ (वय ५४) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

ठाणे Railway Passenger Robbery Case: रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र, कानातील बाली आणि मोबाईल असा मुद्देमाल (woman jewelery and mobile robbed) लुटून पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या चोरट्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करताच दागिने घेऊन धूम ठोकणाऱ्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी काही वेळातच गजाआड केले आहे. (Dombivli railway station robbery) लालबहादूर बाकेलाल यादव (वय २४, रा. पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व) असे अटक चोरट्याचे नाव आहे.

पायी जात असताना कैचीने वार: लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवासी महिला संध्या नागराळ (वय ५४) ह्या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत कुटुंबासह राहतात. त्या डोंबिवलीत काही कामनित्ताने ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापूरहून आल्या होत्या. त्यानंतर लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकातून कोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करून त्या कोपर रेल्वे स्थानकात उतरल्या. यानंतर त्या ईस्टच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी जात होत्या. त्यावेळी रात्री ८ वाजून ५२ मिनिटादरम्यान चोरट्याने महिला संध्या यांच्यावर पाळत ठेवून अचानक त्यांच्यावर त्याने कैचीने वार केला. यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील बाली आणि महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.

चोराला मुद्देमालासह अटक: याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात संध्या नागराळ यांच्या तक्रारीवरून चोरट्या विरोधात भादंवि कलम ३९५, १४, प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तातडीनं चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात करताच कोपर स्थानकानजीक रेल्वे रुळावर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे.

चोराला काही तासातच अटक: या संदर्भात या गुन्ह्याचा तपास करणारे लोहमार्ग पोलीस कर्मचारी निंलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, चोरटा लालबहादूर याला गुन्हा घडल्यापासून काही वेळातच अटक केली गेली. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केलेत का? याचा तपास सुरू केला आहे. तर (आज) ४ नोव्हेंबर रोजी अटक आरोपीला रेल्वे न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहितीही निलंगेकर दिली आहे.

हेही वाचा:

  1. Robbery In Jammu Tawi Express : संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत अनेक प्रवासी जखमी
  2. Devagiri Express : धावत्या देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा; दरोडेखोरांच्या टोळीला अटक
  3. Robbery at Railway : रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.