ETV Bharat / politics

खासदार सुपुत्राच्या काळजीपोटी मुख्यमंत्री पिता मुंब्रामध्ये, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी दीड तास मुंब्र्यात ठोकला तळ - lok sabha election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 11:03 PM IST

CM Eknath Shinde : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार सुपुत्राच्या प्रचाराचा व एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंब्रा-कौसा मध्ये भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे सुमारे दीड तास मुंब्रा मध्ये तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी मुंब्र्यातील शिवसेना शाखेला भेट दिली.

खासदार सुपुत्राच्या काळजीपोटी मुख्यमंत्री पिता मुंब्रामध्ये, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी दीड तास मुंब्र्यात ठोकला तळ
खासदार सुपुत्राच्या काळजीपोटी मुख्यमंत्री पिता मुंब्रामध्ये, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी दीड तास मुंब्र्यात ठोकला तळ (ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

मुंबई CM Eknath Shinde : कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार सुपुत्राच्या प्रचाराचा व एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंब्रा-कौसा मध्ये भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे सुमारे दीड तास मुंब्रा मध्ये तळ ठोकून होते. मुंब्रा येथील ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शिंदे यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत चर्चा केली. तसंच मुंब्र्यातील शिवसेना शाखेला भेट देऊन त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला.



जितेंद्र आव्हाड आहेत आमदार : कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत. या ठिकाणी शिवसेना उबाठा तर्फे वैशाली राणे दरेकर रिंगणात आहेत. मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. हा मुस्लिम बहुल विभाग आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघ असलेल्या मुंब्रा मध्ये श्रीकांत शिंदे यांना चांगला प्रतिसाद मिळावा व चांगली मतं मिळतील याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मुंब्रा मध्ये आले होते.

दगाफटका होऊ नये म्हणून काळजी : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं मुख्यमंत्र्यांसाठी व त्यांच्या पक्षासाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री काळजी घेत असल्याचं चित्र समोर आलंय. स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन किणे यांनी मुख्यमंत्र्यांना मुंब्र्यातील राजकीय परिस्थितीबाबत अवगत केले व या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विजय होतील व त्यामध्ये मुंब्राचा मोठा सहभाग असेल असं किणे यांनी सांगितलं.


मुंब्रा येथील बहुचर्चित शाखेला भेट : ठाकरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घेतलेली शाखा जमीनदोस्त केल्यानं गेल्यावर्षी शिवसेना व उबाठा पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला होता. उध्दव ठाकरे हे या शाखेजवळ आले होते. मात्र, त्यांना शाखेत जाता आलं नव्हतं. त्याठिकाणी किणे यांनी शानदार शाखा उभारली आहे. या शाखेला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन अद्ययावत व सुसज्ज शाखेची पाहणी केली व किणे यांचं अभिनंदन केलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. लोकशाहीचा पवित्र अधिकार मतदान आहे त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शिंदे यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. "भाजपाला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मान्य होतं पण,..."; संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यानंतर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट - Sanjay Shirsat
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.