ETV Bharat / state

Robbery at Railway : रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना अटक

author img

By

Published : Nov 21, 2022, 8:53 PM IST

रेल्वे रुळावर लघुशंका करणाऱ्या एका प्रवाशाला अज्ञात तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण ( Beating with a knife ) केली होती. प्रवाशाकडील रोकड, मोबाईल पळवून चोरट्यांनी धूम ( passenger mobile phone was stolen along with cash ) ठोकली होती. रेल्वे प्रवाशांना रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या ( Three arrested for robbing railway passengers ) आहेत.

robbing railway passengers
robbing railway passengers

ठाणे : रेल्वे प्रवाशांना रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या ( Three arrested for robbing railway passengers ) आहेत. रोहित तेजी उर्फ रीतिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या असे या चोरट्यांची नावे असून तिघे हे सराईत गुन्हेगार आहेत. तर, चौथा चोरटा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीघांना अटक

सीसीटीव्ही फुटेज खबऱ्यामुळे आरोपी तावडीत - काही दिवसांपूर्वी उल्हासनगर रेल्वे स्थानक जवळ असलेल्या रेल्वे रुळावर लघुशंका करणाऱ्या एका प्रवाशाला अज्ञात तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून त्याच्याकडील रोकड, मोबाईल पळवून नेल्याची घटना घडली होती. ( passenger mobile phone was stolen along with cash ) याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला असता, स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही, खबऱ्याने दिलेला माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपी रोहित मुकेश तेजी उर्फ रितिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या या सापळा रचून तिघांना अटक केली. आरोपी रोहितकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

टोळीचा मोरक्या विरोधात डझनभर गुन्हे दाखल - टोळीचा मोरक्या रोहित विरोधात उल्हासनगर, अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, हत्येचा प्रयत्न, हाणामारी सारखे तब्बल डझनभर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. तर आरोपी दीपक उर्फ पांड्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.