ETV Bharat / state

Raid On Cricket Match Betting : क्रिकेट वर्ल्डकप; नेट केबलच्या कार्यालयातील सट्टेबाजांवर पोलिसांची धाड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 9:34 PM IST

Raid On Cricket Match Betting: ठाणे शहरातील उल्हासनगरमध्ये एका नेट केबलच्या कार्यालयात वर्ल्डकप क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या (World Cup Cricket Match Betting Raid) पाच मॅच बुकींवर ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून बिटिंगच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे. (World Cup Cricket Match 2023) हे बुकींना वर्ल्डकप क्रिकेट सामन्याच्या दोन संघांच्या सामन्यावर सट्टा घेत असल्याचे आढळून आले. (Cricket bookies arrested in Thane) या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raid On Cricket Match Betting
क्रिकेट सट्ट्‌यावर धाड

ठाणे Raid On Cricket Match Betting: सुमित नवीन मोटवाणी, दिनेश मुरलीधर रोहरा, भारत मोहन राजपाल, नरेश साजनदास रोहरा असे गुन्हा दाखल झालेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरात महादेव केबल नेट इन्टरप्राइजेस नावाने कार्यालय आहे. या कार्यालयात लपून छपून काही बुकी वर्ल्डकप इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर ३ नोव्हेंबर रोजी पोलीस पथकाने या ठिकाणी अचानक धाड टाकली. यावेळी पाच जण क्रिकेट मॅचवर एका वेबसाईटद्वारे मोबाईलवरून इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांच्या सामन्यावर सट्टा घेताना आढळून आले. (Cricket Betting Thane)

सट्टेबाजांवरील यावर्षीची प्रथम कारवाई: पोलीस पथकाने धाडी दरम्यान घटनास्थळावरून अनेक मोबाईल, दोन लॅपटॉप, डायरी, टीव्ही तसेच ३८ हजार ३०० रुपये रोख रक्कमेसह १ लाख ४२ हजार ९०० रुपयांचे सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी मध्यवती पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार धनंजय ठोमर यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४२०, ३४ सह जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यावर्षी वर्ल्डकप क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर प्रथमच ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे अधिक तपास करत आहेत.

सट्टेबाजीच्या सुत्रधारावर इतरही गुन्हे: सट्टेबाजांचा मुख्य सुत्रधार नरेश रोहरा हा यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यासह गंभीर गुन्हे दाखल असलेला पोलीस रेकॉडवरील तडीपार गुन्हेगार आहे. तरी देखील तो स्थानिक पोलिसांना गुंगारा देत, बिनधास्तपणे आपल्या केबल नेट कार्यालयातून वर्ल्डकप क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्ट्याचा गोरखधंदा चालवत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून ५ नोव्हेंबर रोजी रविवारी सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले. या सर्वांनाच एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी शेंडगे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Betting In IPL Matches: 'आयपीएल'वर इतक्या कोटींचा लागलाय सट्टा! मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे सटोरींची पोलिसांच्या हातावर तुरी
  2. Betting On IPL Cricket Matches: आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या दोघांना दीड लाखांच्या मुद्देमालासह अटक
  3. सोलापुरात उच्चभ्रू सोसायटीत टी-20 विश्वचषकच्या सेमिफायनल मॅचेसवर सट्टा; उच्चशिक्षित तरुणांना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.