ETV Bharat / city

सोलापुरात उच्चभ्रू सोसायटीत टी-20 विश्वचषकच्या सेमिफायनल मॅचेसवर सट्टा; उच्चशिक्षित तरुणांना अटक

author img

By

Published : Nov 12, 2021, 4:52 AM IST

जुळे सोलापुरातील शालिनी ऑर्केड या अपार्टमेंटमध्ये सट्टा घेतला जात आहे. टी-20 विश्वचषकाच्या सेमिफायनल क्रिकेट मॅचेस वर लाखो रुपयांची सट्टा बाजारातील उलाढाल होत आहे. भरारी पथकाने ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाण्याची मदत घेतली आणि बुधवारी रात्री कारवाई केली. कारवाई दरम्यान चौघांना ताब्यात घेण्यात आले.

Betting on T20 World Cup semifinal matches
सोलापुरात उच्च सोसायटीत टी-20 विश्वचषकच्या सेमिफायनल मॅचेसवर सट्टा; उच्चशिक्षित तरुणांना अटक

सोलापूर - जुळे सोलापूर ही सोलापुरातील अतिशय उच्च नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी छापा कारवाई करून टी-20 विश्वचषकाच्या मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक केले आहे. या कारवाई दरम्यान 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा किंवा टी 20 विश्वचषक क्रिकेट मॅचेसवर सट्टा घेणाऱ्याचा मोठे रॅकेट असल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. लवकरच या रॅकेटच देखील पर्दाफाश करून मोठ्या माश्याना बेड्या ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनकुडे पाटील यांची प्रतिक्रिया

सेमिफायनलच्या क्रिकेट मॅचेसवर सट्टा घेणारे उच्चशिक्षित -

पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की, जुळे सोलापुरातील शालिनी ऑर्केड या अपार्टमेंटमध्ये सट्टा घेतला जात आहे. टी-20 विश्वचषकाच्या सेमिफायनल क्रिकेट मॅचेस वर लाखो रुपयांची सट्टा बाजारातील उलाढाल होत आहे. भरारी पथकाने ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाण्याची मदत घेतली आणि बुधवारी रात्री कारवाई केली. कारवाई दरम्यान चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, चौघेही उच्चशिक्षित तरुण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी अमोघ आनंद साखरे (24, रा महादेव गल्ली, मंगळवार पेठ, सोलापूर), नागेश सुभाष येळमेली (33, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर), शिवाजी पांडुरंग हक्के (32,रा. मराठा वस्ती, भवानी पेठ, सोलापूर), प्रभाकर राजशेखर उपासे (28, रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) यांना अटक करण्यात आले आहे. सध्या या तरुणांची 14 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कारवाई दरम्यान अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त -

भरारी पथक आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सट्टा घेत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅटची संपूर्ण झडती घेतली. या झडती दरम्यान 17 मोबाईल हँडसेट, 2 लॅपटॉप, 1 नोटबुक, 1 हॉटमशीन, 14 हजार रुपयांची रोखड असा एकूण 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सट्टा बाजारातील मोठे मासे गळाला लागणार -

सोलापुरात क्रिकेट मॅचेसवर अनेक जण सट्टा घेतात. यापूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील कारवाई केली होती. सोलापुरातील काही मोठे मासे तपासादरम्यान गळाला लागणार असल्याची माहिती भरारी पथकातील पोलिसांनी दिली आहे. हे चौघे तरुण सट्टा घेतलेली रक्कम कुणाला देत होते, किंवा किंवा कुणाकडून यांना मोठ्या रकमा येत होत्या, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. लवकरच सोलापुरातील मोठे मासे गळाला लागणार आहेत.

यांनी केला पर्दाफाश -

सट्टा बाजाराचा पर्दाफाश करण्यात भरारी पथकाने महत्व पूर्ण भूमिका बजावली. यामध्ये एपीआय जीवन निर्गुडे, दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे, नरेंद्र नक्का, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनकुडे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - T20 WC, Aus Vs Pak: जगाला भेटणार नवा विजेता, पाकिस्तानला नमवून ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.