ETV Bharat / state

कल्याणमध्ये किरकोळ वादातून तरुणाची कोयत्याने वार करून हत्या, आरोपी अटक

author img

By

Published : Oct 10, 2020, 4:23 PM IST

murder
किरकोळ वादातून तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

कल्याण पश्चिम भागातील मिलिंद नगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.

ठाणे - कल्याण पश्चिम भागातील मिलिंद नगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेऊन काही तासातच त्यांना अटक केली आहे. किरण भरम असे आरोपीचे नाव आहे.

तपास अधिकारी

मृत सुजित पाटील आणि आरोपी किरण भरम हे दोघे याच परिसरात राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. याच वादातून शुक्रवारी सायंकाळच्या सुमाराला किरण भरम याने आपल्या साथीदारासह सुजित पाटील याला घराच्या परिसरात गाठत कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करत आरोपी किरम भरम याला काही तासातच ताब्यात घेऊन अटक केली आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.