ETV Bharat / state

मेहवण्याने केली भावोजींची चाकू भोकसून हत्या

author img

By

Published : Jun 22, 2021, 12:29 PM IST

Updated : Jun 22, 2021, 2:13 PM IST

हत्या
हत्या

मृत सचिन हा व्यसनाधीन असल्याने तो सतत पत्नीला किरकोळ करणावरून मारहाण करीत असायचा. काल (सोमवारी) रात्रीच्या सुमारास देखील त्यांने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मेहुणा रोशन जाधव हा पती पत्नीमध्ये असलेला वाद मिटवण्यासाठी मृत भावोजीच्या घरी आला होता.

ठाणे - बहिणीला सतत मारहाण करणाऱ्या भावोजीची मेव्हण्याने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 परिसरात सुभाष नगर येथील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मेव्हण्याला बेड्या ठोकल्या आहेत. रोशन जाधव असे पोलिसांनी अटक केलेल्या मेव्हणाचे नाव आहे. तर सचिन खेडेकर असे हत्या झालेल्या भावोजीचे नाव आहे.

मेव्हणा आला होता पती पत्नीचा वाद मिटवायला
उल्हासनगर कॅम्प नंबर 3 सुभाष नगर परिसरात मृतक सचिन खेडेकर हा पत्नी त्यांची शुभांगी सोबत राहत होता. मात्र, मृत सचिन हा व्यसनाधीन असल्याने तो सतत पत्नीला किरकोळ करणावरून मारहाण करीत असायचा. काल (सोमवारी) रात्रीच्या सुमारास देखील त्यांने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मेहुणा रोशन जाधव हा पती पत्नीमध्ये असलेला वाद मिटवण्यासाठी मृत भावोजीच्या घरी आला होता.

पत्नीला मारण्यासाठी आणलेल्या चाकूनेचे पतीची हत्या
वाद मिटवा मिटवी सुरु असतानाच मृत सचिनने पत्नीला ठार मारण्यासाठी धारदार चाकू आणला होता. मात्र, मृत सचिनने तो धारदार चाकू मेव्हणा रोशनवरच हल्ला केला असता रोशनने कसाबसा स्वतःचा बचाव केला. आणि तोच चाकू सचिनला भोसकला. या चाकू हल्ल्यात भावोजी सचिनचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला करणार न्यायालयात हजर
हत्येची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त धूळा टेळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर घटनास्थळी दाखल होऊन संबंधित ठिकाणची पाहणी करीत पंचनामा केला. तर सचिनचा मृतदेह पहाटे उशिरा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी रोशनवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आज दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर कऱण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

Last Updated :Jun 22, 2021, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.