सर्वत्र राम भक्तीची लाट; ठाण्यात राम मंदिर प्रतिकृती आणि झेंडयांना प्रचंड मागणी

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 15, 2024, 4:38 PM IST

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir News : अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच ठाण्यात राम मंदिराच्या छोट्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

राम मंदिराच्या छोट्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल

ठाणे Ayodhya Ram Mandir News : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा नयनरम्य सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशात सर्वत्र राम भक्तीची लाट पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक विविध मार्ग अवलंबत आहेत. यासाठी नागरिक राम मंदिराच्या छोट्या प्रतिकृती विकत घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष : गेली पाचशे वर्ष ज्या क्षणाची समस्त हिंदूधर्मीय जनता वाट पाहत होती तो क्षण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. गेल्या शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर आणि अगणित न्यायालयीन लढायानंतर राममंदिर न्यासाच्या बाजूने निकाल लागला आणि भव्य राम मंदिर निर्माण झाले. यासाठी अनेक राम भक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देश विदेशात रामभक्तीची लाट पसरली आहे.

ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षा कारणास्तव 22 जानेवारी रोजी कोणीही आयोध्येत येऊ नये असं आवाहन केलं होतं. त्यामुळं अनेकांचे मन व्यथित झालं. हा अद्भुत, ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा 'याची देही, याची डोळा' पाहायला मिळेल हे स्वप्न भंगल्यानं अनेक भारतीय नागरिकांनी आता पंतप्रधानांच्या आव्हानानुसार घरातच राहून आपापल्या परीने हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राम मंदिराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती विकत घेण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत. त्यासोबतच श्री रामाचे चित्र असलेले भगवे झेंडे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.

राम भक्तांसाठी राम मंदिर प्रतिकृती : ठाण्यात साइन बोर्डचा व्यवसाय करणारे सतीश वागधरे आणि त्यांचा मुलगा प्रथम वाघधरे यांनी अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या राम मंदिर प्रतिकृती राम भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. चार इंच, सहा इंच आणि 14 इंच या साईजमध्ये या प्रतिकृती उपलब्ध असून त्याची किंमत अत्यंत माफक ठेवण्यात आली आहे. एक लहानशी प्रतिकृती बनवण्यासाठी अनेक तासांची कठोर मेहनत करावी लागते. त्यासाठी प्रचंड एकाग्रतेची गरज असते. परंतु राम भक्तांसाठी ही आपली प्रकारची सेवाच असल्याचं प्रथम वाघधरे यांनी सांगितलं. याच प्रतिकृती ऑनलाइन हजार रुपयांना विकल्या जात असून आपला हेतू त्यातून नफा कमवण्याचा नसल्याचंही त्यानं सांगितलं. राम भक्तीच्या लाटेत प्रत्येकाने सामील व्हावे यासाठीच आपण हा उपक्रम राबवल्याचं प्रथमने सांगितलंय.कोणतीही घासाघीस नाही : राम मंदिराच्या या प्रतिकृतीची आणि झेंड्याची विशेष मागणी लक्षात घेऊन ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. येणारा ग्राहक हा मंदिर पाहिल्यानंतरच सांगितलेल्या किंमतीला मंदिर खरेदी करत आहे. ही प्रतिकृती बनवणाऱ्या प्रथमने सांगितलं की, ग्राहक या प्रतिकृतीसाठी कोणतीही घासागीस करत नाहीत.


ऑनलाईन ला मोठी मागणी : या प्रतिकृतीचा आकार पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना हवीहवीशी वाटणारी ही प्रतिकृती दिसताक्षणिक गर्दी गोळा करत आहे. त्यामुळं ही प्रतिकृती पाहिल्यानंतर ग्राहकांची ऑनलाईन मागणी वाढली आहे. आता मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रथम आणि त्याचे कुटुंबीय यांच्यासोबत त्याचे मित्रमंडळी देखील प्रथमला मदत करत आहेत.प्रथमच्या वडिलांचे मोठे सहकार्य : प्रथमचे वडील सतीश वाघदरे हे साईं बोर्ड व्यावसायिक आहेत. त्यांच्या या कामाचा फायदा प्रथमला राम मंदिर प्रतिकृती बनवण्यासाठी झाला आणि प्रथममध्ये असलेल्या कलेमुळं या प्रतिकृतीला सुंदर आकार देता आला, असं प्रथमचे वडील अभिमानाने सांगतात.


हेही वाचा -

  1. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची अनोखी भक्ती; श्रीराम प्रभूंच्या स्वागतासाठी केला 11 तास राम जप
  2. नाशिकच्या नृत्यांगना करणार अयोध्येत राम-सीता विवाहोत्सवाचं सादरीकरण
  3. राम मंदिर उभारणीमुळं 74 टक्के मुस्लिम खूश; नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, 'या' सर्व्हेतून आलं पुढं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.