वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची अनोखी भक्ती; श्रीराम प्रभूंच्या स्वागतासाठी केला 11 तास राम जप

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 14, 2024, 6:29 PM IST

Shri Ram Jap

Ayodhya Ram Mandir : रामनगरी आयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी श्रीराम प्रभूचा अभिषेक सोहळा होतोय. त्या सोहळ्यामुळं देशात सर्वत्र वातावरण भक्तीमय झाल्याचं पाहायला मिळतंय. आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयास प्रत्यक्षरित्या जाऊ न शकणाऱ्या शिर्डीतील वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी दररोज 11 तास 'श्रीराम जय राम जय जय राम' नामाचा जपातून भक्ती सुमन अर्पण केली आहे.

प्रतिक्रिया देताना वृद्धाश्रमातील महिला

शिर्डी (अहमदनगर) Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा दिवस उजाडणार आहे. कारण या दिवशी मोठ्या उत्साहात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची देशभरात उत्साही वातावरणात तयारी केली जात आहे. या सोहळ्यानिमित्त नुकतेच अयोध्या येथून आलेला अक्षदा कलश श्री साई समाधी मंदिरात (Shri Sai Samadhi Temple) ठेवण्यात आला. त्यानंतर शनिवारी साईबाबा संस्थानला श्रीराम मंदिर उद्घाटनाचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे.

11 तास 'श्रीराम जय राम जय जय राम' नामाचा जप : अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देत आहे. शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील (Dwarkamai Vrudhashram) आजी आजोबांना या सोहळ्यास प्रत्यक्षरित्या जाणे शक्य होणार नसल्यानं, या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान देण्याचा मानस त्यांनी केला. दररोज 11 तास "श्रीराम जय राम जय जय राम" या नामाचा अविरतपणे जप करण्यास सुरूवात केली. नाम जपातून आपल्या आराध्य दैवतेच्या चरणी आपली भक्तीसेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील वृद्ध, निराधार आजी-आजोबांनी आजपासून सुरू केल्याची माहिती, वृद्धाश्रम चालवणाऱ्या किर्तीना यांनी दिली.

पूजाविधीचा कार्यक्रम जाहीर : 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी पूजाविधीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. 16 जानेवारीला ज्या झोपडीत श्री रामाची मूर्ती तयार करण्यात आलीय, तिथून पूजेला सुरुवात होणार आहे. यानंतर मूर्ती तयार करणाऱ्या कारागिराची तपश्चर्या होणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांनी सांगितलं की, 17 जानेवारी रोजी श्री विग्रहाच्या परिसराचा फेरफटका मारून गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. यानंतर १८ जानेवारीपासून रेसिडेन्सी सुरू होईल. दोन्ही वेळी जल अधिवास, सुगंधी आणि गंध अधिवास असेल. 19 जानेवारी रोजी सकाळी फळ आधिवास आणि सायंकाळी धान्य आधिवास असेल. त्याचप्रमाणं 20 जानेवारी रोजी सकाळी पुष्प अर्पण आणि सायंकाळी तुपाचा निवास असेल. तसेच प्राण प्रतिष्ठामध्ये 11 पाहुणे सहभागी होतील.

हेही वाचा -

  1. राम मंदिराच्या उद्घाटन दिनी सार्वजनिक सुट्टी हवी, संतांची केंद्र सरकारकडे मागणी
  2. अयोध्येतील राम मंदिराच्या पूजेमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजाविधीचा समावेश; जाणून घ्या इतिहास
  3. "राम मंदिराच्या उद्घाटनाला कृपया अयोध्येत येऊ नका", जाणून घ्या मोदी असं का म्हणाले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.