ETV Bharat / state

APMC Market Corruption : आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत भ्रष्टाचार, संचालकांचा आरोप

author img

By

Published : Oct 28, 2022, 1:14 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक आरोप चक्क तेथील संचालकांनी केला ( Asia largest market Corruption ) आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक आरोप चक्क तेथील संचालकांनी केला ( Asia largest market Corruption ) आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये भ्रष्टाचार

टेंडर न काढता कोट्यवधीची कामे :आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या एपीएमसी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतं असल्याचा आरोप खुद्द एपीएमसीचे संचालक शेतकरी प्रतिनिधी राजेंद्र पाटील यांनीच केला आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली ( Corruption in APMC market ) आहे. एपीएमसी मार्केटच्या कामाचे टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांची कामे करणे सुरू होते.

25 वर्षांपासून ऑडिटच नाही : याशिवाय भाजीपाला, कांदा बटाटा आणि फळ मार्केटचं मागील 25 वर्षांपासून ऑडिटच न करणे, स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता मर्जितील कंत्राटदाराला कंत्राट देणे आशा एक नव्हे तर अनेक बाबी सर्रासपणे सुरु असून एपीएमसी प्रशासन, बाजापेठेतील संचालक आणि सभापती यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार होतं आहे. यासंबंधी इडीकडे आणि न्यायालयात देखील दाद मागितली असल्याचे एपीएमसी संचालक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.