ETV Bharat / state

Action on Drugs in Solapur : एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; एमडी ड्रग्ज बाजारात पुन्हा आलं सोलापूरचंही नाव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 5:44 PM IST

MD Drug Factory in Solapur
चिंचोळी एमआयडीसी

Action on Drugs in Solapur : सोलापुरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या चिंचोळी एमआयडीसीमधून (Chincholi MIDC) जवळपास 8 किलो एमडी ड्रग्जसाठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज बाजारात याची किंमत जवळपास 16 कोटी रुपयांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चिंचोळी एमआयडीसीमधून जवळपास 8 किलो एमडी ड्रगचा साठा जप्त

सोलापूर Action on Drugs in Solapur : सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या चिंचोळी एमआयडीसीत (Chincholi MIDC) कारवाई झाल्यानं सोलापूरचं नाव पुन्हा एकदा ड्रग्ज बाजारात झळकलं आहे. यापूर्वी एव्हान ऑरगॅनिक कंपनीवर 2016 साली कारवाई झाली होती. एव्हान ऑरगॅनिक कंपनीचा परवाना यापूर्वीच रद्द करण्यात आला होता. एव्हान ऑरगॅनिक कंपनीमधून दोन हजार कोटींचा इफेड्रिन साठा जप्त करण्यात आला होता.

मुंबई, नाशिक नंतर सोलापुरात ड्रग्ज साठा जप्त : मुंबई पोलिसांच्या पथकानं (Mumbai Police Action on Drugs) नाशिकमधून 300 कोटींहून अधिकचं ड्रग्ज जप्त केलं होतं. तर, त्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली मोठी कारवाई केली होती. यावेळी नाशिक पोलिसांनी ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल जप्त केला होता. मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्जचा धंदा सुरू होता. सोलापुरातील विविध भागात ड्रग्ज साठा आढळून येत असल्यानं सोलापुरात खळबळ उडाली आहे. चिंचोली एमआयडीसीत एका बंद कारखान्यात हा धंदा सुरू होता.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या बाजारात सोलापूरचं नाव : सोलापुरात एमडी ड्रग्ज साठा आढळून येणं हे काही नवीन नाही. ठाणे पोलिसांच्या टीमनं 2016 साली एव्हान ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारून 18 हजार किलो इफेड्रिन पावडर जप्त केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात 18 हजार किलो इफेड्रिनची किंमत 2 हजार कोटी होती. 2017 मध्ये एव्हान ऑरगॅनिक कंपनी मधील ड्रग्ज सदृश्य पदार्थ नष्ट करण्यात आला होता. दुसऱ्यांदा सोलापुरात ड्रग्जचा मोठा साठा आढळल्यानं सोलापूरचं नाव आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या बाजारात आलं आहे.

बंद कारखान्यात 16 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी आहे. चिंचोली एमआयडीसीत अनेक प्रकारचे विविध कारखाने व गोडाऊन आहेत. या ठिकाणी असलेल्या एका बंद पडलेल्या कंपनीतून 16 कोटींचा ड्रग्सचा साठा मुंबई गुन्हे शाखेनं जप्त केला आहे. या कारवाईमुळं सोलापुरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

  1. Nashik MD Drug Case : नाशिक एमडी ड्रग प्रकरणावरुन राजकारण; कनेक्शन थेट अंडरवर्ल्डशी?
  2. मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, डोंगरी परिसरातून 50 कोटींचे ड्रग्स जप्त तर महिलेसह तिघांना अटक
  3. MD Drugs Destroyed : ४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज नष्ट, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कार्यवाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.