ETV Bharat / state

MD Drugs Destroyed : ४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज नष्ट, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कार्यवाही

author img

By

Published : Jun 2, 2023, 10:39 PM IST

अंमली पदार्थ विरोधी कक्षाला ४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 'मेफेड्रॉन' म्हणजेच 'एम. डी.' हा अंमली पदार्थ नष्ट करण्यात यश आले आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने याप्रकरणी आठ आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.

MD Drugs Destroyed
एमडी ड्रग्ज नष्ट

मुंबई: युनिटने नालासोपारा, अंबरनाथ, अंकलेश्वर आणि गुजरात येथील केमिकल कंपनीतून एकूण २४२९ किलो ४२० ग्रॅम वजनाचा व ४८५६ कोटी ४१ लाख रूपये किंमतीचा 'एम.डी.' साठा जप्त केला होता. या गुन्ह्यामध्ये अटक आरोपींकडून अद्यापपर्यंत एकूण १० कोटी पेक्षा जास्त किंमतीची स्थावर व जंगम मालमत्ता गोठविण्यात आली आहे. सक्षम प्राधिकारी, एन.डी. पी.एस., वित्त मंत्रालय आणि भारत सरकारने याबाबत आदेश दिले होते.

जप्त ड्रग नष्ट: अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या या न्यायप्रविष्ठ गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थाची नाश प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार २४२९ किलो ४२० ग्रॅम वजनाचा 'मेफेड्रॉन (एम.डी.)' हा अंमली पदार्थ आज 2 जूनला शासन मान्यताप्राप्त 'सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी'मध्ये भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला आहे.

या अधिकाऱ्यांनी दर्शविली उपस्थिती: मुंबई पोलीस हे अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. ही कार्यवाही मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मान्यतेने तसेच विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीचे प्रतिनिधी पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, आर्थिक गुन्हे शाखा, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस उप आयुक्त प्रकाश जाधव, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये पार पडली.

यांनी केली कायदेशीर प्रक्रिया: प्रभारी पोलीस निरीक्षक भांडारगृह किरण लोंढे, प्रभारी पोलीस निरीक्षक वरळी युनिट संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम, पोलीस उप निरीक्षक मानसिंग काळे आदी पोलिसांनी या अंमली पदार्थाची नाश प्रक्रिया करण्यासंबंधीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.

हेही वाचा:

  1. Father Killed Son : व्यसनाधीन पोराकडून आयफोनसाठी हट्ट, बाप चिडला अन् केला घात
  2. Medical Controversy : अमरावतीत डिस्कउंटचा वाद ; २८ मेडिकल धारकांविरुद्ध गुन्हा
  3. Nashik ACB Action: मनपा शिक्षण अधिकारी धनगर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.