ETV Bharat / state

सिंधुदुर्गात 14 लाख 40 हजार रूपयांची बनावटीची दारू जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

author img

By

Published : Dec 23, 2020, 9:42 PM IST

Updated : Dec 23, 2020, 10:44 PM IST

गोव्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या टेम्पोमधून 14 लाख 40 हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू बुधवारी (दि. 23 डिसें.) उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाई
कारवाई

सिंधुदुर्ग - गोव्याहून कोल्हापूरला जाणार्‍या टेम्पोमधून तब्बल 14 लाख 40 हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू बुधवारी (दि. 23 डिसें.) उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोवा ते कोल्हापूर होत होती वाहतूक

मुंबई गोवा महामार्गावर गोवा ते कोल्हापूर जाणार्‍या टेम्पोतून दारू वाहतूक होत असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नांदगाव येथे चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो पडकला. त्यात तपासणी केली असता गोवा बनावटीच्या 3 हजार 600 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत 14 लाख 40 हजार रूपये आहे.

टेम्पो व चालकाला घेतले ताब्यात

या प्रकरणी टेम्पो चालक भरत संजय चव्हाण (वय 28 वर्षे, रा.अदमापूर, ता. भुदरगड, जि.कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच दारू साठ्यासह 7 लाख रूपये किंमतीचा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या प्रभारी निरिक्षक जी.सी.जाधव, सहायक निरीक्षक जी. एल. राणे, जवान एस. एस.चौधरी, जे. आर. चव्हाण, महिला जवान एस. एस. कुवेसकर यांचा सहभाग होता.

सातत्याने होते मोठी वाहतूक

मागील दोन महिन्यात सातत्याने गोवा बनावटीच्या दारूवर जिल्ह्यात कारवाई केली जात आहे. जिल्हा पोलिसांनीच दीड कोटीची दारू पकडली आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून बुधवारी (दि. 23 डिसें.) पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गातील ८० वर्षीय आजी लक्ष्मी पालव यांनी अवघ्या सव्वादोन तासांत सर केला रांगणागड

हेही वाचा - सिंधुदुर्गतील आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या गुन्हेगारीवर आता सीसीटीव्हीची नजर

Last Updated :Dec 23, 2020, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.