ETV Bharat / state

बाळासाहेबांच्या रूपाने कराड उत्तरला 30 वर्षांनी मंत्रीपद; सहकार खाते मिळणार?

author img

By

Published : Dec 31, 2019, 9:57 AM IST

Updated : Dec 31, 2019, 11:04 AM IST

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅनिबेट मंत्रीपद देण्यात आले आहे. माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांच्यानंतर कराड उत्तर मतदारसंघाला तब्बल 30 वर्षांनंतर मंत्रीपद मिळाले.

मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेब पाटील
मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेब पाटील

सातारा - कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅनिबेट मंत्रीपद देण्यात आले आहे. सोमवारी (दि. 30 डिसें.) त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कराडमधील मंगळवार पेठ, दत्त चौक आणि मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांच्यानंतर तब्बल 30 वर्षानंतर कराड उत्तरला मंत्रीपद मिळाले आहे. बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरमधून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांना सहकार खाते मिळेल आणि सातार्‍याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच दिले जाईल, असे संकेत मिळत आहेत.

जल्लोष करताना कार्यकर्ते


आमदार पाटील हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार पेठ, दत्त चौकात डिजीटल स्क्रीनची सोय केली. त्यामुळे नागरिकांना शपथविधी सोहळ्याचे थेट प्रेक्षपण पाहता आले. त्यांनी शपथ घेताच कराडसह मतदार संघात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आमदार बाळासाहेब पाटील हे 1992 सालापासून राजकारणात सक्रिय आहेत. सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील त्यांची कारकीर्द सुरू झाली. 1996 साली कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली. 1999 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीतून कराड उत्तरचे आमदार झाले. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाचवेळा ते निवडून आले. 2009 चा (अपक्ष) अपवाद वगळता चार वेळा ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले आणि विजयी झाले. तसेच 1999 पासून आजपर्यंत ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत.

हेही वाचा - कवडीमोल होणाऱ्या माणसांच्या गर्दीत सातारच्या बैलजोडीची मात्र विक्रमी 11 लाखांना विक्री

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असताना उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्क्य कराड उत्तरमधून मिळाले. तसेच पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील कराड उत्तरनेच मताधिक्क्य दिले. सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी आमदार पाटील यांना मंत्रीपद देण्याचे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार कॅनिबेट मंत्रीपद देऊन शरद पवार यांनी एकनिष्ठतेला न्याय दिला आहे. 2004 सालीच बाळासाहेब पाटील हे मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. परंतु, पक्ष त्यांना न्याय देऊ शकला नव्हता. मंत्रीपद देता आले नाही म्हणून शरद पवारांनी त्यांना राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदावर आणि उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली होती.

हेही वाचा - साताऱ्यात राजीनामास्त्र; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मंत्रिपदावरून अनेक दिग्गज नाराज

Intro:कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅनिबेट मंत्रीपद देण्यात आले आहे. सोमवारी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कराडमधील मंगळवार पेठ, दत्त चौक आणि मतदार संघामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांच्यानंतर तब्बल 30 वर्षानंतर कराड उत्तरला मंत्रीपद मिळाले आहे. Body:
कराड (साताारा) : कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅनिबेट मंत्रीपद देण्यात आले आहे. सोमवारी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कराडमधील मंगळवार पेठ, दत्त चौक आणि मतदार संघामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांच्यानंतर तब्बल 30 वर्षानंतर कराड उत्तरला मंत्रीपद मिळाले आहे. बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरमधून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांना सहकार खाते मिळेल आणि सातार्‍याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच दिले जाईल, असे संकेत मिळत आहेत.
  आ. बाळासाहेब पाटील हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार पेठ, दत्त चौकात डिजीटल स्क्रीनची सोय केली. त्यामुळे नागरीकांना शपथविधी सोहळ्याचे थेट प्रेक्षपण पाहता आले. त्यांनी शपथ घेताच कराडसह मतदार संघात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 
  आ. बाळासाहेब पाटील हे 1992 ला राजकारणात सक्रिय झाले. सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील त्यांची कारकिर्द सुरू झाली. 1996 ला कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली. 1999 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीतून कराड उत्तरचे आमदार झाले. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाचवेळा ते निवडून आले. 2009 चा (अपक्ष) अपवाद वगळता चार वेळा ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले आणि विजयी झाले. तसेच 1999 पासून आजअखेर ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत. 
  सातारा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असताना उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्क्य कराड उत्तरमधून मिळाले. तसेच पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील कराड उत्तरनेच मताधिक्क्य दिले. सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी आ. बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद देण्याचे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार कॅनिबेट मंत्रीपद देऊन शरद पवार यांनी एकनिष्ठतेला न्याय दिला आहे. 2004 सालीच बाळासाहेब पाटील हे मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. परंतु, पक्ष त्यांना न्याय देऊ शकला नव्हता. मंत्रीपद देता आले नाही म्हणून शरद पवारांनी त्यांना राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदावर आणि उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली होती. Conclusion:
Last Updated : Dec 31, 2019, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.