ETV Bharat / state

साताऱ्यात राजीनामास्त्र; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मंत्रिपदावरून अनेक दिग्गज नाराज

author img

By

Published : Dec 30, 2019, 12:12 PM IST

सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना डावलल्यामुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

satara ncp
सातारा

सातारा - गेल्या महिन्यापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज(सोमवार) मुहूर्त सापडला आहे. महाविकास आघाडीकडून एकूण ३६ मंत्र्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. मात्र, शपथविधी आधीच राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. मंत्रिपदावरून डावलल्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदारांच्या समर्थकांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना डावलल्यामुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच लोणंद, वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह आठ जिल्हा परिषद सदस्य आज आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या सर्व बातम्या -

LIVE : आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळात वर्णी, प्रणिती शिंदेंचा पत्ता कट

पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष; प्रणिती शिंदेंची संधी दुसऱ्यांदा हुकली

ठाकरे सरकारचा 'महा'विस्तार, 'असे' आहे संभाव्य मंत्रिमंडळ

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ

आज मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या 'या' पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Intro:सातारा – गेल्या महिन्यापासून रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारास आज मुहूर्त सापडला आहे. आज महाविकास आघाडीकडून एकूण ३६ मंत्र्यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश केला जाणार आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्ताराच्या शपथविधी होण्याच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. मंत्रीपदावरून डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या समर्थकांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Body:सातारा जिल्हातील वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना डावल्यामुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तसेच,लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह आठ जिल्हा परिषद सदस्य आज सोमवारी आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Conclusion:सातारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.